आर. आर. आबांचे स्वप्न आपल्याला २०२४ मध्ये पूर्ण करायचं आहे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अभिप्रेत असलेले काम आबांनी महाराष्ट्रात करून दाखवले.
NCP's parivar sawand Yatra
NCP's parivar sawand YatraSarkarnama
Published on
Updated on

अंजनी (जि. सांगली) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (ncp) वाढविण्यासाठी (स्व.) आर. आर. आबा पाटील (R. R. Patil) यांनी मोठे कष्ट घेतले होते. आर. आर. आबांची पोकळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीही भरून काढू शकत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अभिप्रेत असलेले काम आबांनी महाराष्ट्रात करून दाखवले. आबांचे स्वप्न आपल्याला २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण करायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. (R. R. Patil's dream we want to fulfill in 2024 : Jayant Patil)

NCP's parivar sawand Yatra
बारा आमदारांचं काय होणार? राज्यपालांनी पाठवलेलं ते पत्रच निघालं बनावट

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात होती. या मतदारसंघाची आढावा बैठक आर. आर. आबांचे गाव असलेल्या अंजनी येथे घेण्यात आली. त्या आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील उर्वरीत गावांना पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. येथील सर्व गावांना पाणी पुरविण्यासाठी लवकरच उपाय योजना करण्यात येतील.

NCP's parivar sawand Yatra
आमदार अरुण लाड यांच्या कामामुळे विरोधकही घायाळ : जयंत पाटलांकडून भरसभेत कौतुक

आज लोक खत, गॅसचे दर कमी करावेत; म्हणून आमच्याकडे मागणी करतात. पण याचे दर कमी करणे आमच्या हातात नाही. खतांचे दर मोदी सरकार वाढवते. इंधनाचे दरही आज प्रचंड वाढले आहेत. अशावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन दरवाढीबद्दल लोकांना जागृत करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आपण शाहू-फुले-आंबेडकरांना मानतो; म्हणून लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे म्हणता येणार नाही. कारण, आपल्याला लोकांना फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समजावून सांगावे लागतील. या महापुरुषांचे विचार जेव्हा आपण तळागाळात रुजवू, तेव्हाच आपल्या पक्षाच पाया व्यापक होईल.

NCP's parivar sawand Yatra
सोलापूर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल : नव्या नियुक्तांमध्ये कोठेंची भूमिका महत्वाची ठरणार

या वेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण अण्णा लाड, सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रतीक पाटील, सांगलीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शंकर पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अनिता सगरे, सुश्मीता जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष विराज नाईक, युवती जिल्हा अध्यक्ष पुजा लाड, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com