Shivsena UBT : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेध कोल्हापूर जिल्ह्याला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना उभारी मिळाली. आत्मविश्वास वाढला. पण हा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडी कडून खेचून घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला जिल्ह्यात एकही जागा न घेता आल्याने शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले आहेत.
काँग्रेसकडे एक खासदार आणि दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल शून्य असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आव्हान असणार आहे.
वास्तविक पाहता कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले आहे. कधीकाळी सहा आमदार आणि दोन खासदार असलेल्या शिवसैनिककडे आता नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या तीन आमदार आणि एक अपक्ष असे चार आमदार आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे मात्र जिल्ह्यात नेतृत्वच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्यांना केवळ पक्ष आणि नेता जिवंत ठेवण्यासाठी केवळ आंदोलन आणि निवेदनाचा आधार घ्यावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत न घेतल्याने त्याचा फटका बसला. याच संधीचा फायदा शिंदेंच्या शिवसेनेने घेतला.
केवळ आंदोलनाचा फार्स, समन्वयाचा अभाव, स्वतःचा पक्ष मोठ्या करण्यापेक्षा इतर पक्षाच्या नेत्यांना केलेली मदत, स्वपक्षीय नेत्यांकडे दुर्लक्ष करणे, या सर्वांचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला आहे. तर गेल्या दोन ते तीन दशकांपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हाताच्या बोटावर मिळणारे संख्याबळ या जीवावरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिल्लक आहे.
जिल्ह्यातील नेते आणि वरिष्ठ नेते या मधील दुरावा असणारा नेताच मॅनेज झाल्याचा आरोप खुलेआमपणे होत आला आहे. त्याचाच फटका जिल्ह्याच्या नेतृत्वाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे जिल्हाभर नेतृत्व करेल असा चेहराच नाही. त्यामुळे नेतृत्वाची कमतरता या निवडणुकीत भासणार आहे. शिवाय उमेदवारांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सक्षम निर्णय क्षमता असणारा चेहऱ्याची उणीव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत भाकरी परतली जाणार का? याची चर्चा अधिक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.