
BJP MLA Sudhir Mungantiwar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना अनेकांना जबर धक्के दिले. याचा फटका भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही बसला आहे. खातेवाटप, हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतरही याची चर्चा सातत्याने सुरूच आहे. तुमचा मंत्रिमंडळात समावेश का झाला नाही? हा प्रश्न त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.
या प्रश्नाचे उत्तर देताना एका जाहीर कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी नागपूरवर धुके दाटले होते. मात्र कुठलेही धुके परमनंट राहात नाही. असे सांगून त्यांनी मंत्रिमंडळाच्या यादीतून नाव ऐनवेळी कट झाल्याबाबत एक प्रकारे सूचक इशाराच दिला असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील निवडून आलेल्या तीनही आमदारांचा घुग्गुस येथे भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यंच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, माझा मंत्रिमंडाळात समावेश झाला नाही, तेव्हापासून मला अनेक लोक भेटत आहेत. ते सातत्याने तुम्हाला मंत्री का केले नाही हे विचारत आहेत. यापैकी काही जणांना मनातून आनंद होत आहे मात्र ते चेहऱ्यावर दुःख झाल्याचे दाखवत आहेत. काही जणांना खरोखरोच दुःख झाले आहे.'
तर, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दिवशी मी मुंबई येथून विमानाने नागपूरला निघालो होते. त्यावेळी आकाशात धुके दाटले होते. त्यामुळे आमचे विमान नागपूरला उतरलेच नाही. त्यामुळे हैदराबादला जावे लागले. तासभरानंतर धुके दूर झाल्याचा निरोप आला. पुन्हा त्याच विमानाने नागपूरला आलो. कुठलेच धुके परमनंट नसतात. ते येतात आणि निघून जातात. असे सांगून मुनगंटवार(Sudhir Mungantiwar) यांनी टोला लगावला.
भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या टीममध्ये मी पाच महामंत्र्यांची नेमणूक केली होती. यात पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) होते याचा आवर्जून त्यांनी यावेळी उल्लेख केला. त्यानंतर विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांना महामंत्री केले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तसेच मला एकाने विचारले आमदार आणि मंत्री यामध्ये काय फरक आहे. यावर मी म्हणालो, आमदार म्हणजे स्कुटर तर मंत्री म्हणजे कार असते. कारचा वेग जास्त असतो. मात्र तुम्ही चिंता करू नका. सध्या माझ्याकडे स्कुटर असली तरी मी ती एवढी वेगात पळवणार आहो की कारलाही मागे टाकेल. मुनगंटीवर यांनी भाषणात विविध उदाहरणे देऊन अनेकांना टोले हाणले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.