Loksabha Election Result  sarkarnama
विशेष

Loksabha Election Result : दलित-मुस्लिम मतांचे महाविकास आघाडीला पाठबळ, सर्वच राखीव जागांवर विजय

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या यशात दलित आणि मुस्लिम मतदारांचा मतांचा वाटा सर्वाधिक असल्याचे महायुतीचेच नेते बोलत आहे.

Roshan More

दीपा कदम

Mahavikas Aghadi News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पाचही मतदारसंघात महाविकास आघाडीला विजय मिळाला आहे. या लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठबळ दिल्याचे दिसले.

महाविकास आघाडीच्या MVA यशात दलित आणि मुस्लिम मतदारांचा मतांचा वाटा सर्वाधिक असल्याचे महायुतीचेच नेते बोलत आहे. राज्यात अनुसूचित जातींसाठी आरक्षित पाचही मतदारसंघांत विजय मिळवत मुंबईतील खुला मतदारसंघ असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड विजय झाला आहे. त्यामुळे 'मविआ 'कडून एकूण सहा दलित उमेदवार लोकसभेत जाणार आहेत.

महायुतीला विधानसभेत ही टेन्शन

महायुतीने आरक्षित असलेल्या पाचही जागांवर विजय मिळवून विधानसभेला महायुतीचे टेन्श वाढवले आहे. कारण विधानसभेला आरक्षित असलेल्या जागांपैकी 19 जागांवर महाविकास आघाडीला लीड आहे. तर 10 जागांवर महायुतीला लीड आहे.

घटनाबदलाचा मुद्दा निर्णायक

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कर्नाटक तसेच उत्तर प्रदेशमधील नेत्यांकडून राज्यघटना बदलण्या विषयी वक्तव्य केले होते. याच मुद्दा प्रचारमध्ये महाविकास आघाडीकडून वारंवार बोलण्यात आला. इंडिया आघाडीने देखील आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा ठेवला होता. प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदींना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. याच मुद्याचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे दिसत आहे.

निकालाचा धडा

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 29 जागा आरक्षित आहेत. शिवाय 40 ते 45 जागांवर दलित मतदार प्रभावी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळेच राज्यात दलित, मुस्लिम व आदिवासी समाजाला वगळून राजकारणात राजकीय यश मिळवता येत नाही हा धडा जणू लोकसभेच्या या निकालाने राजकीय पक्षांना दिला आहे.

विजयी उमेदवार (अनुसूचित जाती मतदारसंघ)

अमरावती -बळवंत वानखेडे (काँग्रेस)

सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)

रामटेक - श्याम बर्वे (काँग्रेस)

लातूर - डाॅ.शिवाजी काळगे (काँग्रेस)

शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे (ठाकरे गट)

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT