Mahadev Jankar Sarkaranma
विशेष

महादेव जानकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

कोरोनापासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जानकर यांनी केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेली पंधरा दिवसांत कोरोना (corona) रुग्णाची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे, त्यातून राजकीय नेतेही सुटलेले नाहीत. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची भर पडली आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जानकर यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. (Mahadev Jankar's corona test positive)

आमदार महादेव जानकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी कोरोनाची टेस्ट करून घेतली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी सध्या आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तत्काळ टेस्ट करून घ्यावी. तसेच, कोरोनापासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जानकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, राजन विचारे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रोहित पवार, भाजप आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, इंद्रनील नाईक, निलय नाईक, माधुरी मिसाळ, प्रताप सरनाईक, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदींसह सर्वपक्षीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी, पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT