Maharashtra BJP Success Reasons: विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापन केलेल्या महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कालावधीतील कामगिरीवर महाराष्ट्रातील जनतेने विश्वास दर्शवला आहे. उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार या तीन मुद्यांवर फडणवीस सरकार करत असलेला सकारात्मक संवाद नागरिकांपर्यंत पोचत असल्याचे 'सकाळ' आणि 'पोल पंडित' यांनी एकत्रितपणे केलेल्या अभ्यासात दिसून आले.
गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र झपाट्याने बदलले. त्यानंतर शिवसेनेतील बंड आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे राजकीय समीकरणेच बदलली. या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते.
यात देवेंद्र फडणवीस-अजित पवार-एकनाथ शिंदे यांनी एकत्रित कामगिरी करत महायुतीचे बहुमताचे सरकार सत्तेत आणले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांतील कामगिरीचे मूल्यमापन राज्यातील जनता कशी करते, हे 'सकाळ' आणि 'पोल पंडित' यांनी एकत्रितपणे केलेल्या अभ्यासातून समोर आले.
यानुसार, राज्यातील 54 टक्के जनतेच्या मते फडणवीस सरकारची कामगिरी चांगली आहे. 27 टक्के जनतेला सरकारची कामगिरी खराब वाटते, तर 19 टक्के जणांना ही कामगिरी सरासरीच असल्याचे वाटते. विधानसभा निवडणुकीत मिळवलेले प्रचंड बहुमत आणि फडणवीस यांच्या मांडणीत सातत्याने येणारा विकासाचा मुद्दा जनतेसाठी अपेक्षा वाढवणारा ठरत आहे.
सध्या राज्यात बहुपक्षीय सरकार असले तरीही स्थिर सरकार असल्याने सर्वांगीण विकासाला गती मिळू शकेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. विशेषत: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असल्यामुळे विकासासंदर्भात राज्यातील जनतेच्या अपेक्षा असल्याचेही स्पष्टपणे नोंदवण्यात आले आहे. शंभर दिवसांचा कारभार पूर्ण करून स्थिर होत असलेल्या राज्य सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, ही सार्वत्रिक मागणी आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.