Rahul Narwekar-Balasaheb Thorat Sarkarnama
विशेष

Maharashtra Interim budget 2024 : बाळासाहेब थोरातांनी पहिल्या तासातच सरकारला धारेवर धरले, ‘आम्ही रात्रभर जागचं राहावं का?’

Rahul Narwekar-Balasaheb Thorat News : मला पहाटे साडेपाच वाजता कामकाजपत्रिका मिळाली, अशी तक्रार थोरात यांनी केली. नार्वेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. पण, यावेळी थोरात आणि नार्वेकर यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली.

Vijaykumar Dudhale

Mumbai News : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सरकारला पर्यायाने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मला पहाटे साडेपाच वाजता कामकाजपत्रिका मिळाली, अशी तक्रार थोरात यांनी केली. नार्वेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. पण, यावेळी थोरात आणि नार्वेकर यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, अध्यक्ष महोदय, आजची कामकाजपत्रिका मला पहाटे साडेपाच वाजता मिळाली. सभागृहात सकाळी नऊ वाजता पाहण्यासाठी मिळाली आणि दहा वाजता तर सभागृहाचे काम सुरू झाले. कामकाजाची तयारी करायची असेल आणि त्याला गुणवत्ता द्यायची असेल तर कामकाज पत्रिकासुद्धा वेळेत मिळायला हवी. आम्ही यापूर्वीच आणि वेळेत विषय दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असुधारित म्हणून का होईना पण कामकाज पत्रिका लवकर येणे अपेक्षित असतं. कामकाज पत्रिका उशिरा मिळाली तर सदस्य कशा पद्धतीने तयारी करतील. त्यांनी सभागृहात कधी यावं आणि बसावं, अशी व्यथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत मांडली.

बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीवर विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेल्या गोष्टीची चौकशी करण्यात येईल. विलंब का झाला, हे तपासले जाईल. पण, कामकाज पत्रिका ही ऑनलाईन आणि ‘मेल’द्वारे बरीच आधी देता येते आणि ती देण्यातही आलेली आहे. फिजिकलही (हार्ड कॉपी) ती मिळणे अपेक्षित आहे. पण, थोरातांनी सांगितलेल्या गोष्टीची चौकशी करण्यात येईल आणि यापुढे कामकाज पत्रिका वेळेत मिळेल, याचे नियोजन करण्यात येईल.

अध्यक्ष नार्वेकर यांच्या उत्तरावर बाळासाहेब थोरात यांचे समाधान झाले नाही. त्यांनी नार्वेकर यांना जाब विचारत कामकाजपत्रिका मला ऑनलाईनच पहाटे साडेपाच वाजता मिळाली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, रात्री ९. ५४ लाच कामकाज पत्रिका ऑनलाईन दिली आहे. ‘मध्यरात्री एक वाजता तुम्ही टाकली असेल तर आम्ही रात्रभर जागं राहावं का,’ असा सवाल थोरात यांनी अध्यक्ष नार्वेकर यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT