Akola News : मराठा आरक्षणावरुन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारवर घणाघाती टीका करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे.सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात असून फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव आहे, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
यावरुन एकीकडे वातावरण तापले असतानाच आता ठाकरे गटाच्या आमदारानेही फडणवीसांविषयी खळबळजनक दावा करुन राजकीय वर्तुळात नाव बॉम्ब टाकला आहे.सुरतला गेलो असताना मलाही असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला आहे.
बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालुक्यातील कुटासामध्ये दाखल झाली होती.यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.त्यात देशमुखांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढविला.ते म्हणाले,आपण सुरतला असताना त्यांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केली आहे.
देशमुख म्हणाले,देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नक्की तसे करू शकतात. मला त्यांचा अनुभव आहे.मला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते असे यापूर्वीच तुम्हांला सांगितले होते. त्याप्रमाणे फडणवीस काहीही करू शकतात.सत्तेचा दुरुपयोग करणे,अत्याचार करणे,हा एकमेव धंदा त्यांचा महाराष्ट्रात सुरू आहे.मग त्याच्या माध्यमातून इतर पक्षातील लोक फोडत आहेत,असेही विधान देशमुखांनी यावेळी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली आहे.ते म्हणाले,श्रीरामाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपनेच श्रीरामाची तत्व पायदळी तुडविली आहे.भाजपने श्रीरामाचा आदर्श घ्यावा.श्रीरामांनी सीता वनात असताना केलेल्या पूजेत बसण्यासाठी सीतामातेची सोन्याची मूर्ती बनवली होती. मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पूजेला एकटे कसे बसले? असा सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी केला आहे.
आधी पोलिसांच्या वतीने गोळीबार करून, आता फूट पाडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलनात फूट पाडायचे षडयंत्र आहे. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ आहे. फडणवीसांना राज्यात मराठे मोठे झालेले पाहायचे नाही. त्यासाठी त्यांनी मला वेळोवेळी संपवण्याचा प्रयत्न केला. सलाईनच्या माध्यामातून विष देण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. एन्काऊंटर करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांना माझा बळी हवा आहे तर मीच त्यांच्या सागर बंगल्याकडे येतो, असे आव्हान देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.