Bachchu Kadu Nagpur protest for farmers loan waiver agitation. Sarkarnama
विशेष

Farmers Loan: एकीकडे महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी महाएल्गार; तर गुजरातमध्ये व्यावसायिकानं फेडलं तब्बल 290 शेतकर्‍यांचं कर्ज!

Gujrat Farmers Loan News: महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन छेडलं जात असतानाच दुसरीकडे गुजरातमध्ये एका व्यावसायिकानं बळीराजासाठी दाखवलेला मनाचा मोठेपणा कौतुकाचा विषय ठरत आहे.

Deepak Kulkarni

Gujarat News: मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी,पूरसंकट, पिकांचे कोसळलेले दर यांसह विविध कारणांमुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी उचलून धरली जात आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शेतकरी नेत्यांनी नागपूर येथे मोठं आंदोलन उभारलं आहे. पण याचदरम्यान,आता शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत डोळ्यात पाणी आणणारी घटना घडली आहे.

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात एका मुलानं आपल्या आईसाठी मोठा निर्णय घेतला आहे.या त्याच्या निर्णयामुळे सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. गुजरातमधील सूरत येथील उद्योग विश्वात मोठं नाव असलेल्या उद्योगपती बाबुभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या प्रेमाखातर तिच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत स्वतःच्या गावातील तब्बल 290 शेतकऱ्यांचं सुमारे 90 लाख रुपयांचं कर्ज फेडलं.

एका कार्यक्रमात उद्योगपती बाबुभाई जिरावाला यांनी गावातील 290 शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज फेडल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रं वाटप करण्यात आलं. जिरावाला यांनी उचललेल्या या कौतुकास्पद पावलामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयानंतर उद्योगपतींचं आभार मानले आहे. यावेळी शेतकर्‍यांनी (Farmers) आमच्या गावच्या सुपुत्रानं फक्त कर्ज फेडत आम्हांला ऋणातून मुक्त केलं नाही, तर गमावलेला आत्मसन्मानही परत प्राप्त करुन दिला आहे.

विशेष म्हणजे उद्योगपती बाबुभाई जिरावाला यांच्या या निर्णयाने संपूर्ण गाव एका झटक्यात कर्जमुक्त झालं. याबाबत जिरावाला म्हणाले,“ आईचे दागिने विकून गावासाठी काहीतरी चांगलं काम करावं, ही आमच्या आईची इच्छा होती.त्यामुळेच आम्ही हा गावकऱ्यांचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. आमच्या गावच्या तब्बल 290 शेतकऱ्यांचं कर्ज फेडून आम्ही आईची इच्छा पूर्ण केली. आज आम्ही अत्यंत समाधानी आणि आनंदी असल्याची भावनाही जिरावाला यांनी बोलून दाखवली.

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातल्या जीरा गावात शंभर वर्ष जुन्या सहकारी संस्थेचा वाद होता. 1990च्या दशकात या संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. याचमुळे जीरा गावातील शेतकऱ्यांच्या नावावर चुकीनं कर्ज नोंदवलं गेलं आणि त्यामुळेच गावातील शेतकरी बँक कर्जापासून वंचित राहिले. प्रकरण न्यायालयात गेले आणि अनेक वर्षं रखडलं.

आता सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून ‘नो कर्ज प्रमाणपत्र’ वाटप करण्यात आलं. गावकऱ्यांनी व्यावसायिक बाबुभाई जिरावाला यांचे आभार मानले.महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन छेडलं जात असतानाच दुसरीकडे गुजरातमध्ये एका व्यावसायिकानं बळीराजासाठी दाखवलेला मनाचा मोठेपणा कौतुकाचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT