Ajit Pawar On Chakankar: फलटण प्रकरणातील चाकणकरांची भूमिका खटकली; अजितदादांकडून मोठ्या निर्णयाचे संकेत; अध्यक्षपद जाणार?
Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण पेटलं आहे. या प्रकरणात विरोधकांकडून फडणवीस सरकार आणि गृहखात्यावर ताशेरे ओढले जात असतानाच अनेक धक्कादायक बाबीही समोर आणल्या जात आहे. फलटण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पीडित महिलेविषयी हादरवणारे दावे केले होते. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) चाकणकरांना चांगलंचं फटकारलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता.30) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यांशी सहमत नसल्याचं सांगत पहिल्यांदाच फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी भूमिका स्पष्ट केलं आहे. युवतीच्या कुटुंबीयांशी अजित पवार यांनी रूपाली पाटील ठोंबरे यांच्या फोनवरून मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला डॉक्टरसाठीच्या न्याय लढाईत तुमच्यासोबत असल्याची भूमिका मांडली.
अजित पवार यांनी आपण नेहमी सत्याच्या बाजूने असल्याचं सांगत महिला आयोगाच्या रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, अशी रोखठोक विधान केलं.याचवेळी त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सातत्यानं वादाच्या भोवर्यात सापडणार्या रूपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणावरुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातील घडामोडींवर पत्रकार परिषदेत भाष्य करताना त्यांनी पीडितेची चारित्र्यहनन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळं पीडित डॉक्टर महिलेच्या आई-वडिलांनी चाकणकर ज्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडं तक्रार केली आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही, पण त्यांनी असं का केलं? याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती पवारांनी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात राज्य महिला आयोग, पोलिस तपास यावर शंका उपस्थित केली होती. तसेच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले होते. पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता.
महिला आयोगावरील एखादी व्यक्ती प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जर राजकीय हस्तक्षेप करत असेल. त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ते करावं, भाजपकडे जावं, अजून कुठं जायचं, तिथं जावं. मला त्यात काही म्हणायचं नाही, पण त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी त्या जर एखाद्या लेकमातेवर चिखलफेक करणार असतील, तर ते आम्हांला मान्य नाही असंही अंधारे यांनी म्हटलं. त्याचमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात कायदेशीर कोर्टात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत हजर होत्या. यावेळी त्यांनी संबंधित मृत पीडित डॉक्टरच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रुपाली चाकणकर यांनी फलटण प्रकरणापूर्वीही पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण, स्वारगेट बस डेपोतील महिला अत्याचार प्रकरणात देखील पीडित महिलांबाबत धक्कादायक दावे केले गेले होते. चाकणकरांनी पीडित महिलांचं चारित्र्यहनन करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याचमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावरुन दूर करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता अजित पवारांनी फलटणच्या प्रकरणात भूमिका मांडल्यानंतर चाकणकरांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

