Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

Fadnavis-Shinde On Ajit Pawar : ‘अजितदादांना सहशिवसेनाप्रमुख करा...’: शिंदे-फडणवीसांनी विधानसभेत घेतली पवारांची फिरकी

Vijaykumar Dudhale

मुंबई : राज्यपालांच्या आभारप्रदर्शनाच्या भाषणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले की, अजितदादादा तर आता शिवसेनेचे जोरदार प्रवक्ते झाले आहेत. त्यांना आता पदच देण्याचे बाकी आहे. तेवढ्यात शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘दादांना सहशिवसेनाप्रमुख करा,’ असे सुचविले. त्यावर मुख्यमंत्रीही ‘हं सहशिवसेनाप्रमुख’ असं म्हणाले. पण, तेवढ्यात त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय आठवला. ('Make Ajit Dada Saha Shiv Sena Pramukh...': Devendra Fadnavis suggests to Eknath Shinde)

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला होता. शिवसेनेशी गद्दारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत, अशी कडवट टीका केली होती. तसेच, विधानसभेतही त्यांनी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यावर निशाणा साधला होता. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज उत्तर दिले

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजितदादा, तर आता शिवसेनेचे जोरदार प्रवक्ते झाले आहेत. त्यांना आता पदच देण्याचे तेवढे बाकी आहे. तेवढ्यात शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दादांना, सहशिवसेनाप्रमुख करा,’ असे सुचविले. त्यावर मुख्यमंत्रीही ‘हं सहशिवसेनाप्रमुख’ असं म्हणाले. तेवढ्यात त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय आठवला आणि म्हणाले ‘ते आता सहशिवसेनाप्रमुखही होऊ शकत नाहीत. कारण, शिवसेना आपल्याकडे आहे. अजितदादा, तीपण संधी गेली (सभागृहात प्रचंड हशा होतो).

ते मला एकदा बोलत होते (मी बोलणार नव्हतो. पण दादा, एवढं कडक बोलायला लागले, त्यामुळे मीही बोलतो म्हणून शिंदेंनी सुरुवात केली) एकनाथराव, तुम्ही आमूक आमूक माणसाला भेटलात का. बघा असं आहे की, काही लोकांनी जो अगोदर निर्णय घेतला आहे, राणे, वगैरे. त्यांना पुढच्या निवडणुकीत प्रॉब्लेम झाला. शिवसैनिक एकदम तीव्र असतात. मी म्हणालो, मी असं कोणाला भेटलोच नाही. मी त्यांना बोलणार होतो की, शिवसैनिक तीव्र असतात. शिवसेना लढाऊ आहे. शिवसेनाच मी आहे. तोच मी आहे. मी तुम्हाला हे पहिले बोललो नाही. कारण, मी पहिले बोललो असतो तर तुम्ही जाऊन (हातवारे करत) गडबड केली असती, ना, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT