Ajit Pawar, Milind Narvekar Sarkarnama
विशेष

Milind Narvekar News : नार्वेकरांचं चाललंय काय; अजितदादांसोबत जवळीक?

Milind Narvekar News : शिवसेनेत बंड झाल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांची दोनदा भेट घेतली होती.

ज्ञानेश सावंत : सरकारनामा

Milind Narvekar News : शिवसेनेतून चार डझन आमदार, डझनभर खासदार फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतची 'मैत्री' सांभाळणारे शिवसेनेचे (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडणार असल्याचे अडाखे बांधले गेल्याने नार्वेकरांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. त्यानंतरही एकदा-दोनदा शिंदे आणि नार्वेकरांचे फोटो झळकले.

मात्र, या साऱ्या चर्चा थांबवून नार्वेकर ठाकरेंसोबत 'अॅक्टिव्ह' मोडवर दिसत आहेत. हेच नार्वेकर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी जवळीक वाढवत असल्याने शिवसेनेतूनच बोट दाखवले जात आहे. भर म्हणजे, अधिवेशनासाठी नागपूरमध्ये ठाकरेंसोबत आलेले नार्वेकर हे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात, त्यामागे महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे कारण आहे.

मात्र, पवार आणि नार्वेकर या सभीकरणामुळे ते राष्ट्रवादीच्या प्रेमात आहेत की जाळ्यात अशी चर्चा भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली आहे. याआधीही 'एमसीए' च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करीत होते. तेव्हाही पवार-नार्वेकर भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. चार दिवसांपूर्वीच्या विरोधकांच्या मोर्चात आणि मोर्चाच्या तयारीत नार्वेकर हे अजित पवारांच्या क्लोज असल्याचे दिसत होते. मोर्चाच्या सभेत तर ते ठाकरेंभोवती कमी आणि अजित पवारांसोबत अधिक दिसत होते.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांची दोनदा भेट घेतली होती. त्यानंतर नार्वेकर हे शिंदे गटात जाणार, ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री होणार, अशा चर्चा पसरल्या होत्या. त्या काळातील अनेक घटनांनी नार्वेकर दिवसागणिक राजकीय केंद्रस्थानी होते.

मात्र, ते कधी काही बोलले नाहीत. नार्वेकरांच्या मनात काय आहे, असा प्रश्न चर्चेत होता. नार्वेकर ठाकरेंचे विश्वासू म्हणून कायम असल्याच्या त्यांच्या वागण्यातून दिसत आहे. आता मात्र, गेल्या काही दिवसांत नार्वेकर हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारच नव्हे; शिंदे गटातूनही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात भाजपचे काही नेतेही मागे राहिलेले नाही.

त्यात नार्वेकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. या बैठकीनिमित्त ते पुन्हा अजित पवारांची भेटी जाणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ज्या प्रमाणे ताकद दाखविणे अपेक्षित होते त्यात ते काही कमी पडल्याची चर्चा आहे. मात्र, आता ठाकरे हे नागपुरात आल्याने उद्यापासून विरोधकांचा आवाज वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची रणनीती आखण्यासाठी नार्वेकरांची पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT