Raju Shetti -Sadabhau Khot  Sarkarnama
विशेष

तुम्ही बारामतीतील फुकटच्या आमरसाचं बिलही भीक मागून भागवा : सदाभाऊंचा राजू शेट्टींना टोला

तुमचं आयुष्य डब्यातून पैसे गोळा करण्यातच गेले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः ‘‘आमचा शेतकरी नेता म्हणत होता की अशोक शिनगारे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या हॉटेलचे बिल मी भीक मागून पैसे गोळा करून देणार आहे. त्या नेत्याला माझं सांगणं आहे की, बारामतीला जाऊन तुम्ही फुकटचा आमरस खाऊन आला आहात. ते बारामतीचं बिलही भागवायचं राहिलं आहे. तेही तेवढं तुम्ही भीक मागून भागवा,’’ अशा शब्दांत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपले एकेकाळचे सहकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यावर हल्लाबोल केला. (MLA Sadabhau Khot criticizes former MP Raju Shetti)

पंचायत राज समितीच्या माध्यमातून सांगोल्याचा दौऱ्यावर आलेले सदाभाऊ खोत यांना अशोक शिनगारे या हॉटेलमालकाने अडवून ‘अगोदर माझे पैसे द्या; मगच पुढच्या दौऱ्यावर जावा’ असे म्हणून थकीत बिलासाठी हुज्जत घातली होती. त्यानंतर खोत यांनी या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना शिनगारे यांनी आपण त्यावेळी शेतकरी संघटनेत होतो, असे सांगितले हेाते. तसेच राजू शेट्टी यांनीही तो संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे मान्य करत भीक मागून त्याची उधारी चुकती करण्यात येईल, असे सांगितले हेाते, त्यामुळे चिडून सदाभाऊंनी शेट्टी यांच्यावर पलटवार केला.

सदाभाऊ खोत म्हणाले की,आमचे महान नेते, १२८ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी सहकारी म्हणाले की अशोक शिनगारे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. तर मग त्यांच्या छातीवरील संघटनेचा बिला गेला कुठं. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं तो डिजिटलवर स्वागत करतो, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. राष्ट्रवादीचा नेता म्हणून तो डिजिटल लावतो आणि आमचा शेतकरी नेता म्हणतो की, शिनगारे हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या हॉटेलचे बिल मी भीक मागून गोळा करून देणार आहे. त्या नेत्याला सांगतो की, तुम्ही बारामतीला जाऊन फुकटचा आमरस खाऊन आला आहात. ते बारामतीचं बिलही भागावयचं राहिलं आहे, तेही तुम्ही भीक मागून भागवा. कारण, तुमचं आयुष्य डब्यातून पैसे गोळा करण्यातच गेले आहे. त्यामुळे राजकारणाची पोळी तापलेल्या तव्यावर भाजण्याचे काम ही सगळी मंडळी करत आहेत.

हॉटेल चालक अशोक शिनगारे हेही कॅमेरे घेऊन पैसे मागायला आले होते. त्यांचे काय लग्न होतं का, फक्त ढोल ताशांच राहिलं होतं. त्यांनी सांगितलेल्या तारखाही चुकीच्या आहेत. तुमच्याकडे निवडणुकाच्या तारखाही नाहीत. त्यामुळे आम्ही जेवायला खायला घालणारी माणसं आहेत. आम्ही फुकटची खाणारी माणसं नाहीत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT