MSRTC employees staging protests over delayed salaries, questioning the absence of key political supporters.  Sarkarnama
विशेष

MSRTC salary issue : 'एसटी' कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गोंधळ; पण नेते कुठे झाले गायब?

Overview of the MSRTC Salary Dispute : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निम्माच पगार झाल्यामुळे गदारोळ झाला असताना नेते मात्र शांतच होते

सरकारनामा ब्यूरो

ST workers protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मागणी केलेल्या निधीपैकी थोडीच रक्कम सरकारकडून आल्यामुळे मार्चचा पगार ५६ टक्के एवढाच झाला. यावरून कर्मचारी वर्गातून नाराजीचा सूर उमटला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने यात हस्तक्षेप केल्याचे दिसून आले. 'यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल', असे आश्वासनही सरनाईक यांनी दिले. पण या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला.

एरवी तावातावाने बोलणारे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गेले कुठे? -

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांचे मोठे आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडवून आणले. बेताल वक्तव्ये करत सदावर्ते यांनी त्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसोबत राज्यातील जनताही वेठीस धरली होती. सध्याही गुणरत्न सदावर्ते विविध मुद्यांवर भाष्य करत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ५६ टक्के एवढाच झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सदावर्ते यांनी काय भूमिका घेतली?

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांचे नेतृत्व मान्य करून आंदोलन पुकारले, तेच आता सदावर्ते यांच्याविषयी नाराज झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४४ टक्के कपात झाली तरीही सदावर्ते यांनी आवाज उठवला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

सदावर्ते यांच्यासह शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हेदेखील मैदानात उतरले होते. आता मात्र तेही शांत आहेत. काहीतरी आपल्या पदरात पडेल, या आशेने आंदोलनात उतरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता वाली कोण, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT