High Court News : काय सांगता! जिल्हा सत्र न्यायाधीश पदासाठी एकही पात्र नाही! उच्च न्यायालयाकडून निकाल जाहीर

Rajasthan High Court District Judge Exam 2025: परीक्षेसाठी ज्येष्ठ न्यायाधीश पात्र होते. ज्यांना किमान पाच वर्षांचा सेवाकार्यकाळ असेल, अशा न्यायाधीशांनी ही परीक्षा दिली. 99 सिनियर जज या परीक्षेसाठी पात्र ठरले.
All candidates failed in Rajasthan High Court's district judge recruitment exam
All candidates failed in Rajasthan High Court's district judge recruitment examsarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : उच्च न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश या पदोन्नतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायाधीश पदासाठी परीक्षा घेतली. त्या परीक्षेचा धक्कादायक निकाल लागला आहे.

यात एकही परिक्षार्थी पास झाला नाही,त्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीश पदासाठी एकही उमेदवारांचा पात्रता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदासाठी एकही जण लायक नसल्याचे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

न्यायव्यवस्थेत कार्यरत असलेल्या व्यक्तीसाठी ही परीक्षा होती. यात नवीन वकीलांसाठी ही परीक्षा नव्हती. कायद्याचा अभ्यास असलेल्या अनुभवी व्यक्तींच ही परीक्षा देण्यासाठी पात्र होते. तरीही एकही जण पास होऊ शकला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

All candidates failed in Rajasthan High Court's district judge recruitment exam
Jayalalithaa Political Journey: मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाय ठेवणार नाही! 'अम्मां'नी करुन दाखवलं...

राजस्थानमध्ये उच्च न्यायालयाच्या या परीक्षेसाठी 9 जुलै 2024 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ज्येष्ठ न्यायाधीश पात्र होते. ज्यांना किमान पाच वर्षांचा सेवाकार्यकाळ असेल, अशा न्यायाधीशांनी ही परीक्षा दिली. 99 सिनियर जज या परीक्षेसाठी पात्र ठरले.

आता राज्यभरातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई हायकोर्टातून तब्बल 1025 न्यायाधीशांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्या-मुंबईसह बीड व इतर न्यायालयांमधील न्यायाधीशांचाही समावेश आहे.

मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल समीर आडकर यांनी हे शनिवारी (ता. 5) आदेश जारी केले आहेत. राज्यभरातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्यरत जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com