Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

BJP News : भाजपची मेहरनजर; केंद्रापासून ते विधानपरिषदेपर्यंत पुण्यातील नेत्यांची वर्णी का?

Devendra Fadnavis On Pune BJP : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पुण्यातील नेत्यांना सातत्याने झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीत भाजपचे गड ढासळत आहेत. मात्र, पुण्यात भाजपच्या नेत्यांनी गड राखल्याचं चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात भाजपचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

काँग्रेसचा (Congress) गड असलेले पुणे आता भाजपच्या हातात गेलं, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. हा गड राखण्यासाठी भाजपची मेहरनजर सातत्याने पुणे शहरावर राहिली आहे.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे जाळं पसरले. एक वेळ पुण्यात भाजपचे आठ आमदार, एक खासदार आणि शंभर नगरसेवक होते. सध्या शहरातील आठ पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.

तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे भाजपची पुण्यातील ताकद काही प्रमाणात कमी झाली असली, तरी वर्चस्व मात्र भाजपचं आहे. त्याला अधिक बळ देण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे.

त्यामुळेच पहिल्यांदाच लोकसभेला निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना थेट केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने पुण्यात मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवले.

आता योगेश टिळेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत भाजपने पुण्यावर मेहरनजर केली आहे. त्यामुळे भाजपसाठी पुणे शहर महत्वाचं असल्याचं टिळेकर यांच्या उमेदवारीनं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पुण्यातील नेत्यांना सातत्याने झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळालं आहे. फडणवीस यांनी त्यांच्या मर्जीतील नेत्यांना सातत्याने विविध पद देत बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी पुणे हे एक महत्त्वाचे शहर आहे. कसबा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपने पुण्यावरती विशेष लक्ष दिले असल्याचे पाहायला मिळते. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विजय मिळाला असला आहे.

तरी 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील सर्वच्या सर्व जागा महायुतीला मिळण्यासाठी भाजप 'गेम प्लॅन' आखत आहे. सध्या होणाऱ्या या राजकीय घडामोडी त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT