BJP Announced Legislative Council Candidates : न्यूज पेपर विक्रेता होणार आमदार !

Legislative Council Candidate : विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेले अमित गोरखे नक्की कोण आहेत? त्यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी का दिली, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत....
Bjp Amit Gorkhe
Bjp Amit GorkheSarkarnama

Pune News : आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ओबीसी नेते योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड मधील अमित गोरखे यांना देखील भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हे अमित गोरखे नेमके कोण याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मातंग समाजाचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व म्हणून गोरखे यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची लहानपणापासूनची नाळ जोडलेली आहे. न्यूज पेपर विक्रेता, शिक्षण संस्थाचालक, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. त्यांच्या आई अनुराधा गोरखे या भाजपकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविका होत्या. अमित गोरखे यांना भाजपने (BJP) आता विधानपरिषद सदस्य पदासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे.

Bjp Amit Gorkhe
Chandrakant Patil : पुढच्या आषाढीची पूजा कोण करणार?; चंद्रकांतदादांनी केला मोठा दावा

पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात सक्रिय असे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी विविध पदांवरती काम केलं आहे.त्यांचं मूळ गाव श्रीगोंदा, अहिल्यानगर असले तरी पिंपरी चिंचवडला गेल्या 40 वर्षापासून ते रहिवासी आहे. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.एम ए (सोशोलॉजी),एमबीए (एच आर)पर्यंतचे उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आहे.

पिंपरी चिंचवड क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरघोस काम केलं आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2014 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाशी त्यांची लहानपणापासूनची नाळ जोडलेली असून न्यूज पेपर विक्रेता ते विधानपरिषद सदस्य पदासाठीची उमेदवारी त्यांचा असा प्रवास राहिला आहे.

Bjp Amit Gorkhe
Bjp News : मोठी बातमी : भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, फुकेंना उमेदवारी

भाजपाकडून प्रदेशसचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra-Fadanvis) यांच्या मर्जीतील कार्यकर्ता म्हणून गोरखे यांच्याकडं पाहिलं जातं. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारानंतर चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिर स्थावर करण्याचे काम त्यांनी केले.

मात्र त्यांना यासाठी अवघा चार महिन्यांचा कालावधी मिळाला होता. पिंपरी विधानसभेसाठी भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अमित गोरखे हे इच्छूक होते. त्यादृष्टिने गेल्या काही महिन्यांपासून त्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली होती.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com