Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
विशेष

Ramdas Athawale News: नागालॅंडमध्ये दोन आमदार निवडून येतात; पण महाराष्ट्रात ताकद असूनही का येत नाहीत : आठवलेंची खंत

सरकारनामा ब्यूरो

Shirdi News: रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार नागालँडसारख्या राज्यात स्वबळावर निवडून आले. महाराष्ट्रात आपली मोठी ताकद असतानाही आपले आमदार का निवडून येऊ शकत नाहीत. नागालँडप्रमाणे राज्यातही रिपब्लिकन पक्षाचे आमदार का निवडून येणार नाहीत. कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध काम केल्यास आपले आमदार निवडून येतील त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. (Nagaland elects two MLAs; But why are not Wining despite their strength in Maharashtra : Ramdas Athawale)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी (Shirdi) येथे पार पडले. या अधिवेशनाला देशभरातील २८ राज्यांचे रिपाइं प्रतिनिधी उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आठवले यांनी खंत बोलून दाखवली.

शिर्डीच्या अधिवेशनात जशी गर्दी दिसली तशी ती महाराष्ट्रात निवडणुकवेळी दिसली पाहिजे. कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम केले पाहिजे. आपल्याला पक्ष बांधायचा आहे. रिपब्लिकन पक्षाचे काम ३२ राज्यात सुरू आहे. अनेक राज्यांत पक्षाची ताकद वाढविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात मोठी ताकद असूनही आपले आमदार निवडून येत नाहीत, अशी खंत बोलून दाखवली.

आठवले म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडीबरोबर दोन हात करायचे आहेत. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत असतो, त्यांना सत्ता मिळते. पण, वंचितच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता आलेली नाही. माझ्या पाठिंब्याने मात्र, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आलेली आहे. मला प्रकाश आंबेडकरांना हे सांगायचे आहे की, उगाच इकडं तिकडं फिरू नका. इकडं-तिकडं फिरून तुम्हाला काय मिळणार नाही. तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहूया.

उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन तुम्हाला काय मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनाही माझं सांगणं आहे की, तुम्हीसुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला लागू नका. हे दोन्ही पक्ष कसे आहेत, ते मला माहिती आहे, त्यामुळे मीच इकडं आलो आहे. पण उद्धव ठाकरेंनीही विचार करणं गरजेचे आहे. कारण, आता तिकडं राहून काय उपयोग नाही, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT