Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
विशेष

Nagpur Winter Session : अब्दुल सत्तार यांनी विधानसभेतच विरोधकांपुढे हात जोडले....

Vijaykumar Dudhale

Nagpur News : तांदूळ अवैध साठ्याच्या प्रश्नावर पणन मंत्री अब्दुल सत्तार उत्तर देत असताना विरोधकांकडून वारंवार हस्तक्षेप करण्यात येत होता. त्यामुळे वैतागलेल्या सत्तार यांनी विरोधकांपुढे हात जोडत विधानसभा अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली.

या वेळी सुनील केदार आणि सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. केदार हे मला वारंवार डिस्टर्ब करतात, अशी तक्रारच सत्तार यांनी केली. नार्वेकर यांच्या हस्तक्षेपानंतर सत्तार यांनी उत्तर दिले. (Nagpur Winter Session : Abdul Sattar was frustrated by repeated interference from the opposition)

काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी तांदळ्याच्या बेकायदा साठ्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत संबंधित पुरवठादाराचा परवाना रद्द करणार असा सवला केला. गृह आणि पुरवठा विभागाच्या कारवाईत तांदळाचा साठा सापडला आहे. पुरवठादार साठा करू शकतो का. त्याच्यावर काय कारवाई केली आणि त्यांचे लायन्स आपण रद्द करणार का, असा सवाल कांबळे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कांबळे यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सत्तार उठत असताना विरोधी बाकावरून कमेंट करण्यात आली. त्यावर ‘थोडं जरा बोलू द्या,’ असे म्हणत पणन मंत्री सत्तार यांनी हात जोडले. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत ‘बोला बोला, मी ऐकतो आहे,’ असे म्हणताच सत्तार यांनी पुढील उत्तर दिले.

कांबळे यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. संबंधित पुरवठादाराकडे तांदळाचा साठा सापडलेला आहे. त्यानंतर दोन रेशन दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच, २२ दुकानदारांची चौकशी सुरू आहे.

हा तांदूळ तपासण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविला आहे. संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. अहवाल आल्यानंतर संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येईल. त्यावर विरोधी पक्षाकडून पुन्हा आक्षेप घेण्यात आला. सदस्यांच्या आक्षेपानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर सत्तार यांनी दिले.

सुनील केदार आणि रणजित कांबळे यांनी पुन्हा प्रश्न विचारले. संबंधित पुरवठादारांकडून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे लायन्स रद्द करणार का, असा सवाल केला. त्यावर मंत्री सत्तार यांनी होय असे उत्तर दिले. अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित पुरवठादार आणि खरेदीदाराचे लायन्स रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. त्यावर यशोमती ठाकूर यांनी ‘तुम्हाला ते करावंच लागेल’ अशी कमेंट केली.

या वेळी सुनील केदार मध्येच बोलत होते. मला हे नेहमीच डिस्टर्ब करतात. मला संरक्षण द्या, अशी मागणी सत्तार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर संबंधित प्रकरण हे कोर्टात सुरू आहे, त्याचा निकाल लागेपर्यंत संबंधित पुरवठादाराचा परवाना रद्द करण्यात येईल, असे सत्तार यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT