Shivsena MLA Disqualification: '...तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल'; ठाकरे गटाच्या वकिलांचा मोठा दावा

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सकाळच्या सत्रात जोरदार युक्तिवाद करत अनेक मुद्दे उपस्थित केले.
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुनावणी सुरू आहे. ही अंतिम टप्प्यातील सुनावणी आजपासून (18 डिसेंबर) सलग तीन दिवस चालणार आहे.

आज सकाळी 8.30 वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करत मोठा दावा केला. "शिंदे गटाचा दावा मानायचा झाला तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना निलंबित करावे लागेल," असा युक्तिवाद कामत यांनी केला.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सकाळच्या सत्रात जोरदार युक्तिवाद करत अनेक मुद्दे उपस्थित केले. "इतक्या वर्षांत एकही कार्यकर्ता किंवा आमदाराने पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत, असे सांगितले नाही. त्यामुळे तुम्ही हा सर्व नंतर केलेला बनाव आहे.

जर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नव्हते, तर तुमच्या समोर एकच मार्ग होता, तो म्हणजे तुम्ही सर्वजण अपात्र ठरता. कारण तुमच्या सर्वांची निवड ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे," असं कामत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; सुनावणी अंतिम...

'...तर सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल'

"पक्षाची रचना घटनाविरोधी आहे, हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड ठाकरेंनी केली. त्याच घटनाविरोधी पक्षरचनेचे शिंदे हे लाभार्थी आहेत. पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल.

कारण, त्याच घटनाविरोधी पक्ष नेतृत्वात निवडणुका लढवल्या व ते आमदार झाले. शिंदेंचा दावा मानायचा झाला तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना निलंबित करावे लागेल. त्यामुळे शिंदे गटाचा हा दावा फ्रॉड आहे,"असा युक्तिवाद कामत यांनी केला.

"विधिमंडळ पक्ष हा मर्यादित कारणासाठी आहे. राजकीय पक्षापासून विभक्त होताना विधिमंडळ पक्षाला मर्जिंगशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील व्हा, तुम्हाला वाट्टेल ते करा," असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. त्यामुळे आता शिंदे गटाच्या वकिलांकडून काय युक्तिवाद करण्यात येतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Dr.Pravin Gedam: राजकीय नेत्यांना धडकी भरवणारे डॉ. प्रवीण गेडाम कोण आहेत ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com