Pune News : लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील क्षमता ओळखली होती. त्यांनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान द्यावे, असं टिळकांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती चालविणाऱ्या श्यामजीकृष्ण वर्मा यांच्याकडे सावकरांची शिफारस केली होती. त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सावकरांनी लंडनमध्ये बॅरिस्टर बनावं, अशी टिळकांची इच्छा होती. अशा कित्येक युवकांना त्यांनी तयार केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिळक आणि सावकर यांच्या नात्यावर भाष्य केले. (Narendra Modi comments on Tilak-Savarkar relationship)
लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) राष्ट्रीय पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना गौरविण्यात आले. त्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले की, भारताने नेहमी अशा नेतृत्वाला जन्म दिला की, त्यांनी स्वातंत्र्यासारख्या मोठ्या लक्ष्यासाठी संघर्ष केला. तसेच, समाजातील दुषप्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी नवी दिशाही दाखवली. आजच्या युवक पिढीला ही मोठी शिकवण आहे. लोकमान्य टिळक यांना हे माहिती होते की, स्वातंत्र्याचे आंदोलन असो की राष्ट्रनिमार्णचे मिशन, भविष्याची जबाबदारी कायम युवकांच्या खांद्यावर राहणार आहे. भारताच्या भविष्यासाठी शिक्षित आणि सक्षम युवक तयार झाला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.
लोकमान्य टिळक यांच्याकडे युवकांची प्रतिभा ओळखण्याची दिव्यदृष्टी होती. त्याचे एक उदाहारण आपल्याला वीर सावरकर यांच्याशी संबंधित घटनेत मिळते. त्या वेळी सावकर हे युवक होते. लोकमान्य टिळक यांनी सावरकरांची क्षमता ओळखली होती. सावरकरांनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे आणि परत येऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करावे, अशी टिळकांची इच्छा हेाती, असेही मोदी यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले की, ब्रिटनमध्ये श्यामजीकृष्ण वर्मा हे हरहुन्नरी युवकांना संधी देण्यासाठी दोन शिष्यवृत्ती चालवत होते. एका शिष्यवृत्तीचे नाव छत्रपती शिवाजी, दुसऱ्या स्कॉलरपशिपचे नाव महाराणा प्रताप असे होते. वीर सावरकर यांच्यासाठी लोकमान्य टिळकांनी वर्मा यांच्याकडे शिफारस केली होती. त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सावरकर यांनी लंडनमध्ये बॅरिस्टर बनावं, अशी त्यांची इच्छा होती. अशा कित्येक युवकांना टिळकांनी तयार केले.
पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालय आदी संस्थांची स्थापना त्यांच्या याच व्हिजनचा हिस्सा आहे. या संस्थांमधून असे अनेक युवक तयार झाले. त्यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्याचे मिशन पुढे चालवले आणि राष्ट्रनिर्माणमध्ये आपली महत्वाची भूमिका पार पाडली. व्यवस्था निर्मितीतून संस्थांची निर्मिती, संस्थेच्या निर्मितीतून व्यक्तीची निर्मिती आणि व्यक्ती निर्मितीतून राष्ट्रनिर्मितीचे व्हीजन राष्ट्रासाठी दिशादर्शक हेाते. टिळकांनी दाखवलेल्या त्या दिशेनेचे देश आज वाटचाल करीत आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.