Chhagan Bhujbal  sarkarnama
विशेष

Video Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांची अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे नेणार?

NCP Chhagan Bhujbal Upset in Party Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मात्र पक्षाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : राज्यसभा निवडणुकीत संधी मिळेल, अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे चर्चा होत्या. मात्र, आपण नाराज नसल्याचे भुजबळ यांनीच स्पष्ट केले असले तरी भुजबळ अस्वस्थ आहेत हे नक्की.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी आपला मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधून त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी देखील केली.

भुजबळ Chhagan Bhujbal यांना भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते.मात्र, त्यांना उमेदवारी मिळण्यात शिवसेनेचा शिंदे गट प्रमुख अडसर ठरला. त्यामुळे भुजबळ यांची उमेदवारी हुकली.

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एका जागेवर नुकतीच निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ही जागा सोडण्यात आली होती. यानिमित्ताने भुजबळ यांना दिल्लीच्या राजकारणात जाण्याची एक संधी उपलब्ध होऊ शकली असती.

राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून भुजबळ यांनी प्रयत्न केले. मात्र पक्षाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही संधी देखील हुकल्याने भुजबळ नाराज आहेत हे लपून राहिलेले नाही.

राज्यात सध्या महायुतीतील घटक पक्षांचे विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस NCP अजित पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या जागा वाटपावरून मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भुजबळ यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरते की अडचण करून जाते हा सध्या चर्चेचा विषय आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT