Sharad_Pawar sarkarnama
विशेष

Sharad Pawar Politics: शरद पवार निफाडमध्ये भाकरी फिरवणार! मेळाव्यात सूचक संकेत

NCP Sharad Pawar Niphad Assembly constituency : शरद पवार यांच्याशी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अनेक मुख्य प्रवाहातील नेते संपर्कात आहेत. निफाड मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम तसेच विविध उमेदवार स्पर्धेत आहेत.

Sampat Devgire

Sharad Pawar News : लोकसभेच्या यशानंतर विधानसभेची तयारीला ज्येष्ठ नेते शरद पवार लागले आहेत. पवार दौरे करत स्थानिक राजकीय समीकरणे जुळवत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चाचपणी करत आहेत. त्यातच शुक्रवारी (ता.19) निफाडमध्ये झालेल्या विविध पक्षातील नेत्यांनी पवार समर्थक म्हणून हजेरी लावली. त्यावेळी निफाडमध्ये भाकरी फिरवणार, असल्याचा सूचक संदेश पवार यांनी दिला.

चितेगाव फाटा येथे पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सहकार महर्षी मानोजीराव मोगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोगल यांच्याबरोबर काम केलेल्या आणि पुलोद मध्ये सक्रिय असलेल्या नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

या निमित्ताने अनेक माजी आमदार आणि नेते एकत्र आलेले दिसले. या सर्वांचा उल्लेख शरद पवार यांनी आवर्जून केला. 1985 च्या 'पुलोद' प्रयोगातील सहकाऱ्यांचे योगदान त्यांनी सांगितले. या भाषणात पवार यांनी अतिशय सूचक संकेत दिले आहेत.

पवार Sharad Pawar म्हणाले, मालोजीराव मोगल यांची अपूर्ण राहिलेली कामे पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र राजेंद्र मोगल हे सक्रिय आहेत. विविध समाज घटकांशी संपर्क ठेवून ते काम करीत आहेत. मालोजीराव मोगल यांनी निफाड साखर कारखान्यासह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी योगदान दिले. या संस्था मोठ्या केल्या.युवकांनी आणि सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मालोजीराव मोगल यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजेंद्र मोगल यांना सहकार्य करावे.

निफाडच्या उमेदवारीसाठी स्पर्धा

पवार यांच्याशी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अनेक मुख्य प्रवाहातील नेते संपर्कात आहेत. निफाड मतदारसंघासाठी शिवसेना Shivsena ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम तसेच विविध उमेदवार स्पर्धेत आहेत. असे असताना पवार यांनी राजेंद्र मोगल यांचा विशेष उल्लेख केला. त्यामुळे पवार यांच्या मनात निफाड मतदारसंघासाठी वेगळे काही विचार घोळत असावेत का? असा सूर असा चर्चे सुरू आहेत.

पवारांच्या 'त्या' विधानाची चर्चा

मालोजीराव मोगल पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. मात्र 1995 च्या निवडणुकीत त्यांनी मालोजीराव मोगल यांना उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी पवार यांनी 'भाकरी फिरवावी लागते'असे विधान केले होते. पवार यांच्या त्या विधानाची निफाड विधानसभा निवडणुकीत खूप चर्चा झाली होती.मोगल यांनी तेव्हा बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली होती. या बंडखोरीमुळे निफाड मध्ये काँग्रेसच्या प्रवाहा बाहेरचे अर्थात शिवसेनेच्या मंदाकिनी रावसाहेब कदम या आमदार झाल्या.

1995 ची पुनरावृत्ती होणार?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निफाड मतदार संघात पाच ते सहा जण इच्छुक आहेत. या प्रस्थापित असलेल्या नेत्यांचा विचार करता शरद पवार 1995 ची पुनरावृत्ती तर करणार नाही ना? अशी चर्चा आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT