China exam security (AI Image) Sarkarnama
विशेष

Gaokao vs NEET : तब्बल 1.30 कोटी विद्यार्थ्यांची 'फुलप्रूफ' परीक्षा; चीनचे कसे असते सुरक्षाकवच? NEET पेक्षा कशी वेगळी?

China exam security, Gaokao examination system : २०२५ च्या परीक्षेवेळी सरकारने विविध कंपन्यांच्या AI Chatbots मधील काही फीचर्स बंद केली. त्यामुळे त्याआधारे कॉपी करणे शक्य झाले नाही.

Rajanand More

NEET paper leak debate : भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट प्रवेश परीक्षेचा पेपर फुटला अन् ही परीक्षाच रद्द करण्यात आली. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला समोर जावे लागणार आहे. याआधीच नीटप्रमाणेच इतर प्रवेश परीक्षा, भरती परीक्षांचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनमधील गायोकाओ (Gaokao) परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी सुमारे १ कोटी ३० लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यासाठी चीन सरकारकडून फुलप्रुफ यंत्रणा युध्दपातळीवर काम करते.

Gaokao परीक्षा कशासाठी?

चीनमधील Gaokao ही देशातील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्रवेशाोसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. जगातील सर्वात कठीण आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा म्हणून ओळखली जाते. लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षणातील करिअर या परीक्षेवर अवलंबून असते. या परीक्षेतील गुणांवरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. दरवर्षी सुमारे सव्वा कोटींहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात.

साधारणपणे वर्षातून एकदा जून महिन्याही परीक्षा घेण्यात येते. गणित, विज्ञान, इंग्रजी, चिनी भाषा आदी प्रमुख विषयांचे ज्ञान या परीक्षेतून पारखले जाते. दोन-तीन दिवस चालणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी काही वर्ष आधीपासून तयारी करत असतात. ही परीक्षा म्हणजे जणू काही सरकारसाठी राष्ट्रीय मोहिमच असते.

पेपरफुटी, कॉपी कशी रोखली जाते?

परीक्षा सुरळीतपणे आणि कॉपीविरहित पार पाडण्यासाठी चीन सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जातात. प्रश्नपत्रिका म्हणजे गोपनीय दस्तावेज म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून, त्याची छपाई, वाहतूक, वितरण अशा प्रत्येक टप्प्यात कडक सुरक्षायंत्रणा तैनात असते.

तंत्रज्ञानाचा वापर

प्रश्नपत्रिकांची वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये GPS, RFID, व्हिडीओ मॉनिटरिंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रत्येक क्षणाला सुरक्षायंत्रणांची करडी नजर प्रश्नपत्रिकांवर असते. एवढेच नाही तर परीक्षा केंद्रांवरही Face Recognition आणि Fingerprint Verification आदी तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे बोगस उमेदवाराला परीक्षा देणे अशक्य असते. नीट परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठीही परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांना नेण्यास बंदी असते.

परीक्षा केंद्रात कॉपी रोखण्यासाठी सिग्नल जॅमर आणि रेडिओ मॉनिटरिंगचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे AI आणि CCTV च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. २०२५ च्या परीक्षेवेळी सरकारने विविध कंपन्यांच्या AI Chatbots मधील काही फीचर्स बंद केली. त्यामुळे त्याआधारे कॉपी करणे शक्य झाले नाही.

गंभीर गुन्हा

चीनमध्ये Gaokao परीक्षेदरम्यान कॉपी करणे किंवा पेपरफुटीमध्ये सहभागी असणे, म्हणजे गंभीर गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यात दोषी आढळून आल्यास कारावासाची शिक्षा होते. अर्थात भारतातही कायद्यांमध्येही अशा तरतुदी आहेत. चीनमध्ये परीक्षेच्या काळात पसरणाऱ्या अफवांवरही कडक कारवाई केली जाते. सोशल मीडियावरही यंत्रणांचे लक्ष असते.

परीक्षा केंद्रांवर सरकारकडून खास सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाते. स्थानिक पोलीस, गरज भासल्यास लष्करालाही पाचारण केले जाते. परिसरातील रस्ते अनेकदा वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या आवाजाचा त्रास होऊ नये, याचाही काळजी घेतली जाते. त्यामुळे दरवर्षी ही परीक्षा म्हणजे चीनच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. प्रत्येक पातळीवर ही परीक्षा अधिक पारदर्शक आणि कॉपीविरहित, पेपरफुटी होऊ न देता पार पाडली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT