Dhananjay Munde Sarkarnama
विशेष

Dhananjay Munde News : ‘सगळं काही ठीक आहे, परफेक्टली वेल’ : अजितदादांना भेटलेल्या धनंजय मुंडेंचे सूचक विधान

Dhananjay Munde Reached in Vidhan Bhavan: नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल; अजित पवारांशी १५ मिनिटे केली चर्चा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे गेली दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापाठोपाठ धनंजय मुंडेही आज विधान भवनात दाखल झाले होते. अजित पवारांसोबत चर्चा करून ते पुन्हा विधान भवनातून बाहेर पडले आहेत. बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी ‘सगळं काही ठीक आहे. परफेक्टली वेल’ असे सूचक विधान केले आहे. (Not Reachable Dhananjay Munde Reached in Vidhan Bhavan; Discussion with Ajit Pawar)

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. त्याचा अतिदादांकडून इन्कार करण्यात येत असला तरी ही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे अजित पवारांची चर्चा होत असताना त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतील आमदार पुढे येत आहेत. पिंपरीचे अण्णा बनसोडे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर यांनी उघडपणे दादांच्या निर्णयासोबत आम्ही जाऊ, असे म्हटले आहेत.

अजित पवार यांचे विश्वासू आणि मागील बंडाच्या काळात महत्वाची भूमिका बजावलेले धनंजय मुंडे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कालपर्यंत ते बीड असूनही नॉट रिचेबल होते. ते कोणाशीही संवाद साधत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः धनंजय मुंडे कुठे आहेत, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आज सकाळीच ते विधानभवनात दाखल झाले. तत्पूर्वी अजित पवार हे विधानभवनात आले होते. त्यांच्याशी धनंजय मुंडे यांनी १५ मिनिटे चर्चा केली.

मुंडे यांनी अजित पवार यांच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. चर्चानंतर बाहेर पडताना त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांना विद्यमान सरकारन स्थगिती दिलेली आहे. त्यासंदर्भात अजितदादांशी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच, सगळं काही ठीक आहे. परफेक्टली वेल’ असे सूचक विधानही जाता जाता त्यांनी केले, त्यामुळे त्या विधानाची पुन्हा चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT