NOTA Sarkarnama
विशेष

Lok Sabha Election: 'NOTA'च ठरणार 'किंगमेकर'; खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांचा मतदारराजा उठवणार बाजार

Lok Sabha Election 2024: देशभरातील सर्वसामान्य नागरिक सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याचं दिसत आहे. मागील काही निवडणुकांमध्ये नागरिकांनी कोणत्याही पक्षाला मतदान करण्याऐवजी 'नोटा'ला (NOTA) मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरून कोणत्याही परिस्थित सत्ता आपल्याकडे खेचून आणण्याची रणनीती प्रत्येक पक्षाकडून सुरू असल्याचं दिसून येत आहे. खरंतर लोकशाहीत मतदारांना सर्वोच्च स्थान असतं. देशाचं आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व कोणाला द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय मतदारांनी घ्यायचा असतो.

पण सध्याच्या राजकारणात याच मतदारांना डावलल्याचं पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे नुकतेच राज्यातील दोन पक्षांमधील बंड आणि यामुळे बदललेलं राज्यातील राजकीय वातावरण. ईडी, सीबीआय आणि इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) प्रकरणामुळे जनता राजकारणाला कंटाळल्याचं दिसत आहे. एकंदरीतच या सर्व नाराजीचा बदला ते मतदानातून घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान (Vote) करण्यापेक्षा मतदार नोटाला (NOTA) मतदान करणं पसंत करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशभरातील सर्वसामान्य नागरिक सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याचं दिसत आहे. मागील काही निवडणुकांमध्ये नागरिकांनी कोणत्याही पक्षाला (Political Party) मतदान करण्याऐवजी 'नोटा'ला (NOTA) मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्येही मतदार अनेक पक्षांनी दिलेल्या उमेदवारांना डावलून नोटाला मतदान करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) देशातील लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. 11 एप्रिलपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासन देताना दिसत आहे, तर काही पक्ष मोठंमोठ्या नेत्यांना फोडून त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या याच फोडाफोडीच्या राजकारणाला, नेत्यांच्या असभ्य वर्तवणुकीला आणि खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपांना कंटाळलेला सर्वसामान्य मतदार नोटाला जवळ करू शकतो.

यापैकी कुणीही नाही

लोकसभा निवडणूक एकून सात टप्प्यात देशभरात पार पडणार आहे. हे मतदान EVM मशिनद्वारे होणार आहे. EVMमध्ये या वेळी उमेदवाराचा फोटोदेखील असणार आहे. त्यामुळे या मशिनवर दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मतदारांना पसंत नसेल तर? तर अशावेळी ते NOTA चा पर्याय निवडू शकतात. नोटा म्हणजे None Of The Above (यापैकी कुणीही नाही). जर ईव्हीएम मशिनवरील एकही उमेदवार मतदारांना पसंत नसेल तर ते नोटाला मत देऊ शकतात.

मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून ईव्हीएम मशीनवरील नोटाच्या बटणाचा वापर वाढल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षी 4 लाख 88 हजारांहून अधिक मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला होता, तर या वर्षीही लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा वापर वाढू शकतो असं सांगितलं जात आहे. शिवाय निवडणूक आयोगाकडील लोकसभा निवडणुकीची मागील 2 वर्षांची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की, NOTAचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे . 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील 48 मतदारसंघांत जवळपास 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला होता.

2019 च्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी 'नोटा'चा वापर जास्त प्रमाणात केला आहे. 2019 मधील निवडणुकीत पालघरमधील मतदारांनी सर्वाधिक 'नोटा'चा वापर केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मतदार नोटाच्या पर्यायाला मोठ्या प्रमाणात पसंती देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT