Kangana Ranaut : कंगनावरील 'ती' पोस्ट काँग्रेसला पडली महागात; निवडणूक आयोगाने 'या' महिला नेत्याला फटकारलं

Congress Vs BJP : महिलांचा अपमान आणि चारित्र हनन केल्याप्रकरणी आयोगाने त्यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले होते.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका जवळ येतील तशा आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर वैयक्तिक टिप्पणी करत बदनामीचे प्रकारही वाढल्याचे दिसून येत आहेत. यातच भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी रनौत यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने श्रीनेत यांना चांगलेच फटकारले आहे. Kangna Ranaut

महिलांवर वैयक्तिक टिप्पणी केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी (ता. 1) भाजप नेते दिलीप घोष आणि सुप्रिया श्रीनेत यांना इशारा दिला. आयोगाने म्हटले, उभय नेत्यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधाने करून त्यांचा अपमान केला आहे. या कृतीतून त्यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. आता आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक वक्तव्य करताना दोघांनीही यापुढे सावध राहावे, असा इशाराच आयोगाने दिला आहे. तसेच आता त्यांच्या सर्व विधानांवर आयोगाकडून विशेष लक्ष असणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीत श्रीनेत आणि घोष यांना बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Kangana Ranaut
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पक्ष फोडले, पण जागावाटपात भाजपच्या गळ्याशी आले...

घोष यांची ममता बॅनर्जीवर टीका

भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerji) यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची खिल्ली उडवली होती. त्याचा व्हिडिओमध्ये व्हायरल झाला होता. ते म्हणाले होते, दीदी गोव्यात गेल्यावर त्या गोव्याच्या कन्या होतात. त्रिपुरात गेल्या की त्या त्रिपुराची कन्या असल्याचे सांगतात. तुमचे वडील कोण आहेत ते त्यांनी ठरवावे. हे योग्य नाही, असे घोष यांनी बॅनर्जी यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती.

दरम्यान, काँग्रेसच्या श्रीनेत (Supriya Shrinet) यांनी सर्व सोशल अकाउंटवरून कंगना यांच्याबद्दल केलेल्या सर्व वादग्रस्त पोस्ट हटवल्या आहेत. तसेच संबंधित पोस्ट त्यांनी केल्या नसून इतर कोणीतरी केल्याचा दावाही त्यांनी केला होता. आयोगाने मात्र उभय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. महिलांचा अपमान आणि चारित्र हनन केल्याप्रकरणी आयोगाने त्यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत घोष आणि श्रीनेते यांना बोलताना आणि सोशल मीडियावर व्यक्त होताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R.

Kangana Ranaut
Rohit Pawar : इंग्रजांनीही विकास केला म्हणून लोक त्यांच्यासोबत गेले का? अजितदादांबाबत रोहित पवार असं का बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com