Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News Sarkarnama
विशेष

Prakash Ambedkar News : ठाकरेंचा मास्टर प्लॅन; मुंबईतून प्रकाश आंबेडकरांना लढवणार? पण आंबेडकर म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आघाडीच्या नेत्यांची आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

बैठकीमध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासाठी समिती स्थापन करण्याचे ठरले आहे. तसेच काँग्रेसने या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी समान जागा वाटपाची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाला १६-१६ जागा देण्याची मागणी काँग्रेसने केल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २० जागांची मागणी केल्याचेही सांगितले जात आहे.

त्या सर्व विषयांवर चर्चा सुरु असतानाचा 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. त्याच प्रमाणे ठाकरे यांनी लोकसभेचीही तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी विशेष रणनीती आखली आहे.

त्यामध्ये मुंबईतील जागा बदलल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गट मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना माध्यमांशी प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

आंबेडकर म्हणाले, माझा मतदारसंघ असताना तुम्ही मला का मतदारसंघ बदलायला लावत आहात. त्या संदर्भातील प्रश्नच येत नाही. अजून युतीबाबत आम्हाला तसा प्रस्तावच आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्यांनी कर्नाटकचे (Karnataka) निकाल बघावे, असा इशाराही आंबेडकर यांनी कुणाचेही नाव न घेता यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT