Ichalkaranji Assembly Constituency : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर महायुतीचा गुंता अधिकच वाढला आहे. भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आवाडे उमेदवारीवरून ठाम असल्याने तीन विधानसभा मतदारसंघात ताराराणी आघाडी कडून उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीची आणखी डोकेदुखी वाढली आहे.
अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप आता आवडेंना संधी देणार की हाळवणकर साथ देणार? किंवा यांच्यात मध्य मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे आहे. पण यानंतर शिवसेना शिंदे गट नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह जयसिंगपूर येथील झालेल्या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तर भाजपकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर भाजपचे सहयोगी सदस्य असलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे(Prakash Awade) हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा करत महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे.
राहुल आवाडे उमेदवार असून त्यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, त्यांच्या उमेदवारीवर महायुतीकडून शिक्कामोर्तब होणार काय, याकडेही लक्ष आहे. विशेषतः महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेल्या सुरेश हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची काय असेल त्यातून वरिष्ठ काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीकडून राहुल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आवाडे यांची समजूत काढून विधानसभेचा शब्द दिला असावा अशी शक्यता आहे. मात्र, ही जागा भाजपकडे असल्यामुळे गतवेळचे भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
महायुतीकडून राहुल यांना उमेदवारी मिळाली नाही, तर ते स्वतःचा पक्ष असलेला ताराराणी पक्षाकडून इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. तर शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघांत उपद्रवमूल्य तयार करू शकतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.