Rahul Awade : राहुल आवाडेंना पाडण्यासाठी विरोधकांची 'गुप्त' बैठक, सुरेश हाळवणकरांना 'सपोर्ट' करणार?

Ichalkaranji Assembly Election 2024 : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अर्धा डझनपेक्षा जास्त अधिक इच्छुक आहेत.
rahul awade suresh halwankar.jpg
rahul awade suresh halwankar.jpgsarkarnama
Published on
Updated on

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीत गुंता अधिकच वाढत आहे. यातच अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीतून पुत्र डॉ. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

राहुल आवाडे ( Rahul Awade ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यनंतर विरोधक आणि भाजप ( bjp ) समर्थकांनी बैठक घेत प्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना मदत करण्याचा गुप्त 'प्लॅन' आखला आहे. त्याबाबतची बैठक मध्यरात्री झाल्याची समजते.

रात्री उशिरा झालेल्या एका बैठकीत विरोधकांकडून एकास एक उमेदवार देण्यासह एका माजी नगराध्यक्षांच्या नावावर एकमत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तर, माजी आमदार सुरेश हाळवणकर ( Suresh Halvankar ) यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना सहकार्य करण्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून ( Mahayuti ) अर्धा डझनपेक्षा जास्त अधिक इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत देखील उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. अशातच अपक्ष आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकत्र येत रात्री 'गुप्त' बैठक घेतली आहे. आवाडे यांचे विरोधक एकत्र येत राहुल आवाडे यांच्या पराभवासाठी 'प्लॅन' आखले जात आहेत.

या 'गुप्त' बैठकीत काही भाजपमधील जबाबदार दोन नेते आणि एका नवीन स्थापन झालेल्या एका आघाडी प्रमुखांची उपस्थिती होती. तर, महाविकास आघाडीतील मुंबईतील मोठा पक्ष असणाऱ्या नेत्याच्या संपर्कात असणारा ‘दादा’ या बैठकीत आघाडीवर होता. जर, महायुतीकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास एकास-एक उमेदवार देण्याची चर्चा झाली. प्रसंगी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पाठिंबा देण्याची चर्चाही यामध्ये करण्यात आली. तसेच तीन संभाव्य नावांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.

दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे विधानसभा मतदारसंघातील मोठे पदाधिकारी राजकीय षडयंत्र रचण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या हालचालींमुळे इचलकरंजीतील राजकारणात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com