Raj Thackeray Sarkarnama
विशेष

MNS News : 19 वर्षांपासून ना सत्ता, ना पद... तरीही राज ठाकरेंची साथ न सोडणारे 8 'खमके नेते'; मनसेसोबत खंबीरपणे उभे

MNS News : सत्ता, पद आणि राजकीय संधी नसतानाही गेली १९ वर्षे राज ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या मनसेच्या नऊ निष्ठावान नेत्यांची राजकीय वाटचाल आणि त्यामागची कहाणी जाणून घ्या.

Hrishikesh Nalagune

Raj Thackeray News : आजच्या राजकारणात पक्षांतर अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. निवडणुकीआधी तिकीटासाठी, निवडणुकीनंतर सत्तेसाठी, निधीसाठी किंवा एखाद्या मोठ्या पदासाठी नेते बिनदिक्कत पक्ष बदत असतात. २०२२ पासून महाराष्ट्रात शिवसेनेत दोनवेळा मोठी फुट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसही विभागली. राष्ट्रीय पातळीवरही पक्षांमध्ये बंड आणि पक्षांतराचे प्रकार घडले.

अशा काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत गेली जवळपास १९ वर्षे सत्ता नसताना, मोठी पदे नसताना आणि अनेक राजकीय चढ-उतार पाहूनही काही नेते कायम एकनिष्ठ राहिले. मनसेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाशी नाळ न तोडणाऱ्या या नेत्यांकडे राजकीय वर्तुळात विशेष नजरेने पाहिले जाते.

बाळा नांदगावकर

मनसे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभा, संघटना आणि मुंबईतील पक्षबांधणीत त्यांचे मोठे योगदान राहिले.

नितीन सरदेसाई

मुंबईतील संघटन उभारणीत नितीन सरदेसाई यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनात आणि निर्णयात ते कायम सक्रिय राहिले.

संदीप देशपांडे

विद्यार्थी संघटनेपासून ते मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदापर्यंतचा प्रवास करणारे संदीप देशपांडे हे मनसेचा प्रमुख चेहरा आहेत. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.

अनिल शिदोरे

संघटनात्मक राजकारणात शांतपणे काम करणारे अनिल शिदोरे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. पक्षाच्या अंतर्गत नियोजनात त्यांचा मोठा सहभाग असतो.

राजू पाटील

कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून काम करताना 2019 ते 2024 मध्ये विधानसभेत मनसेचा झेंडा कायम ठेवण्याचे श्रेय राजू पाटील यांना जाते. मनसेच्या कठीण काळातही त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही.

अविनाश जाधव

ठाणे-पालघर परिसरात मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून अविनाश जाधव ओळखले जातात. अनेक आंदोलने आणि संघटनात्मक मोहिमांमध्ये ते आघाडीवर राहिले.

दिलीप धोत्रे

पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून संघटन उभारणीत सक्रिय असलेले दिलीप धोत्रे यांनी मनसेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.

यशवंत किल्लेदार

मराठवाड्यात मनसेची संघटना उभी करण्यात आणि पक्षाचे जाळे वाढवण्यात यशवंत किल्लेदार यांचे योगदान लक्षणीय मानले जाते.

पक्ष बदलणाऱ्यांची मोठी यादी... पण हे मात्र ठाम

मनसेच्या स्थापनेनंतर अनेक मोठे नेते पक्षातून बाहेर पडले. शिशिर शिंदे, वसंत मोरे, दिलीप लांडे, प्रकाश महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर पक्षाला रामराम केला. मात्र बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अनिल शिदोरे, राजू पाटील, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे आणि यशवंत किल्लेदार यांनी आजतागायत राज ठाकरे यांच्यावरील निष्ठा कायम ठेवली आहे.

मनसेने गेल्या 19 वर्षांत सत्तेचा लाभ फारसा मिळवलेला नाही. तरीही या नेत्यांनी पद किंवा सत्तेपेक्षा राज ठाकरे यांचे नेतृत्व आणि पक्षाशी असलेली बांधिलकी यालाच प्राधान्य दिले. त्यामुळे मनसेच्या राजकीय प्रवासात या 8 जणांचे स्थान वेगळे मानले जाते. आजच्या कथित विकासासाठी सत्तेची वाट धरणाऱ्या आमदार-खासदारांनी एकदा यांचाही पक्षनिष्ठेचा आदर्श जरुर घ्यायला हवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT