Raj Thackeray News : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांतील संघटनात्मक फेरबदल आणि स्थानिक पातळीवरील वाढत्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवलीत संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करत हर्षद पाटील यांची डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
राहुल कामत यांच्याकडे डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद म्हात्रे यांची डोंबिवली विधानसभा जिल्हा संघटक, तुषार पाटील यांची कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा संघटक, संदेश पाटील यांची डोंबिवली विधानसभा अध्यक्ष, विनोद पाटील यांची कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष, तर अरुण जांभळे यांची डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय योगेश पाटील, राजू पाटील, प्रशांत गावड आणि भाग्येश इनामदार यांच्यावरही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते यां पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या नियुक्ती पत्र देऊन सोपविण्यात आल्या. यावेळी मनसे नेते राजू पाटील हे उपस्थित होते. माजी आमदार पाटील यांच्या निर्णयानुसार यां बदल्या करण्यात आल्या आहेत.
नियुक्तीपत्रात नव्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि शिस्तीला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच समाजात पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. सर्व नियुक्त्या एक वर्षासाठी करण्यात आल्या असून, कामगिरीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात सध्या विविध पक्षांकडून संघटनात्मक बदल आणि नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना मनसेनेही कल्याण-डोंबिवलीतील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ही मोर्चेबांधणी केल्याचे मानले जात आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करणे, या उद्देशाने नव्या टीमकडे पाहिले जात आहे. त्यामुळे मनसेच्या या संघटनात्मक बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.