Raj Thackeray addressing supporters during the Maharashtra Navnirman Sena foundation day event  Sarkarnama
विशेष

MNS Foundation Day : मनसेची 20 वर्षे : 'मराठी' कार्ड ते 'हिंदुत्व'..., राज ठाकरेंची धरसोड वृत्ती की राजकीय अपरिहार्यता?

MNS foundation day history and achievements : 9 मार्च 2006 मध्ये शिवाजी पार्कवर मनसेची स्थापनेवेळी राज ठाकरेंनी तडाकेबंद भाषण देत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली होती. मात्र त्यापासून मनसे कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे.

Roshan More

MNS role in Maharashtra politics over 20 years: राजकीय पक्षासाठी 20 वर्षांचा काळ हा फार मोठा समजला जात नाही. मात्र, या काळामध्ये या पक्षाचे पाऊले कोणत्या दिशेने गेली आहेत त्यावरून त्यांच्या राजकीय भविष्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मात्र, मनसेला 20 वर्ष पूर्ण होत असताना मनसे सत्तेपासून कोस दूर असल्याचे दिसून येते.

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या वलयातून बाहेर येत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. 9 मार्च 2006 मध्ये शिवाजी पार्कवर मनसेची स्थापनेवेळी राज ठाकरेंनी तडाकेबंद भाषण देत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली होती. वक्तृत्वाचा करिष्मा असणाऱ्या राज यांच्याकडे महाराष्ट्रातील तरुण आकृष्ट झाला. मात्र, 2009 ची विधानसभा आणि महापालिका निवडणूक वगळता या पक्षाला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे धरसोड वृत्ती.

मनसे हिंदुत्ववादी, मराठी की पुरोगामी विचारांचा आहे, असा प्रश्न आता त्यांच्याच समर्थकांना पडतो. शिवसेनेतून बाहेर पडत 'मराठी माणूस' हा मुद्दा राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला. त्याच आधारावर त्यांनी मुंबई महापालिकेत 2012 मध्ये तब्बल 28 नगरसेवक विजयी झाले होते. तर, नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली आणि पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद.

मराठी आणि विकासाची भाषा या राज ठाकरेंच्या अनोख्या राजकारणातून मनसेला यश मिळाले. मात्र, यश त्यांना टिकवता आले नाही. 2012 मध्ये यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मनसेने 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठींबा जाहीर केला.

मनसेने लोकसभेला आपले उमेदवार देखील उभे केले नाहीत. 2019 ला त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांसाठी ते मैदानात उतरले होते. आणि 2024 ला पुन्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठींबा देत काही ठिकाणी भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला.

राज ठाकरेंची हीच भूमिका पक्षासाठी घातक ठरल्याचे चित्र आहे. मुंबई वगळता पक्षाचा व्होट बँकच कुठे तयार झाली नाही. उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी यंदा मुंबई महापालिकेत युती केली. मात्र, केवळ सहा जागाच त्यांना जिंकता आल्या. त्यामुळे ग्राऊंडला मनसेकडे यंत्रणाच नसल्याचे उघड झाले. राज ठाकरेंचे वलय हीच मनसेची ताकद असल्याचे स्पष्ट झाले मात्र, त्याचे मतामध्ये परिवर्तन करण्यासाठी बूथ स्तरावर कार्यकर्ते नसल्याचे दिसते आहे.

एक वर्तुळ पूर्ण

राज ठाकरे हे 20 वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसे स्थापन केली. आता मनसेची महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती झाली. राज ठाकरेंनी एक वर्तुळ पूर्ण केले आहे. राज ठाकरेंच्या भाषण आणि मुद्दे मांडण्याचा सडेतोडपणा आजही महाराष्ट्रातील एकाही राजकारणाकडे नाही आणि हाच त्यांचा प्लस पाॅईंट आहे.

विचारांची स्पष्टता तरच विजय पक्का...

हिंदुत्वावादी राजकारण करण्यात भाजप अग्रेसर आहे. त्या विचारांची जागा भाजपने व्यापली आहे. तेथे मनसेला फारशी संधी दिसत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईत मराठीच्या राजकारणासाठी मनसेला संधी आहे. हिंदुत्व, विकास आणि मराठी माणसाचे कल्याण या विचारांवर पक्षाची वाटचाल होत आहे. मात्र, हिंदुत्ववादी मतदार त्यांच्याकडे भाजपमुळे आत्ताच आकृष्ट होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हिताचे, हक्काचे राजकारण करणे हा त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणार मंत्र दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT