Jalgaon APMC : गिरीश महाजनांनी फिरवली जादूची कांडी, सहा महिन्यांपूर्वी विरोधात दंड थोपाटणारे चारही संचालक भाजपमध्ये

Girish Mahajan Politics Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीच्या महाविकास आघाडीच्या चार संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सहा महिन्यांपूर्वी सभापती पदावरुन मोठा वाद झाला होता.
Girish Mahajan Jalgaon APMC
Girish Mahajan Jalgaon APMCSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीच्या चार संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता बाजारसमितीतील भाजपची ताकद आणखी वाढल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सहा महिन्यांपूर्वी सभापतीपदाच्या निवडीदरम्यान वाद निर्माण झाला होता. त्या वादाचा धुराळा आता शांत झाला. संबंधित संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे चारही संचालक आता भाजपच्या कमळावर स्वार झाले आहेत.

यावेळी शिवेसना ठाकरे गटाचे बाजार समितीचे संचालक तथा माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, संचालक संदीप पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप पाटील आणि पांडुरंग (राजू) पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. मंत्री महाजन यांनी सर्वांना पक्षाचा गमछा परिधान करुन पक्षात स्वागत केलं. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी सभापती सुनील महाजन आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बाजार समितीशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते.

Girish Mahajan Jalgaon APMC
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आमदारकी 13 मे रोजी संपणार; पुढे काय? संजय राऊतांचे सूचक विधान

सहा महिन्यांपूर्वी जळगाव बाजार समितीत सभापती पदाच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी काही संचालकांनी विद्यमान सभापती सुनील महाजन यांच्या निवडीला विरोध दर्शवला होता. त्यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मण पाटील यांच्या नावाची सभापतीपदासाठी चर्चाही होती. मात्र लक्ष्मण पाटील यांच्या विरोधात सुनिल महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वातावरण तापलं होतं. ऐनवेळी सुनिल महाजन यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीच्या राजकारणात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या घटनेनंतर जवळपास सहा महिन्यांनी आता चार संचालकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Girish Mahajan Jalgaon APMC
Nashik Crime : गोळीबार प्रकरणात तिकडे आरपीआय नेते लोंढे टोळीसह जेलमध्ये, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कुणी केला?

चारही संचालकांनी विकासाच्या दृष्टीने आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरु असलेल्या विकासकामांकडे बघून तसेच त्यात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

Girish Mahajan Jalgaon APMC
Unmesh Patil News: भाजपचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदेंचे उमेश पाटलांना बळ; जळगावात राजकीय गणितं बदलणार?

राज्यात आणि जिल्ह्यात भाजपचे मजबूत नेतृत्व असल्याने विकासाला गती येईल असे संचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान या चार संचालकांच्या भाजप प्रवेशामुळे येत्या काळात बाजार समितीच्या राजकारणात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com