Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
विशेष

RPI Session in Shirdi: ‘अशा लोकांमुळेच पार्टीचा सत्यानाश झालाय’; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला आठवलेंनी झाप झापले

सरकारनामा ब्यूरो

नगर : रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाचे अधिवेशन शिर्डीत सुरू आहे. त्या अधिवेशनादरम्यान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मी एकदा निवडणुकीत पडलो आहे. मात्र, मी दुसऱ्यांदा पडणार नाही. मी पडण्यासाठी माझं राजकारण करत नाही, असे सांगत असताना एका उत्साही कार्यकर्त्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला आठवले यांनी सर्वांसमोर झाप झापले. ‘ए...ए..थांब. आगाऊपण करू नको. असे लोक असल्यामुळे पार्टीचा सगळा सत्यानाश झालाय,’ अशा शब्दांत त्यांनी त्या कार्यकर्त्याला सुनावले. (Ramdas Athawale warned the activist who gave the slogan)

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अधिवेशन शिर्डीत (Shirdi) सुरू आहे. त्याला पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्याह नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर मान्यवरांनी हजेरी लावली. त्या अधिवेशनात बोलताना एका अतिउत्साही कार्यकर्त्याला आठवले यांनी चांगलेच सुनावले.

ते म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूला असते, त्यांना सत्ता मिळते. प्रकाश आंबेकडकर आमचे नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. ते म्हणतात की आमची वंचित बहुजन आघाडी ज्यांच्यासोबत असते, त्यांना सत्ता मिळते. पण वंचित बहुजन आघाडीने कोणाशीही आघाडी केलेली नाही. वंचित आघाडीवाले स्वतःच्या बळावर निवडणूक लढवता आणि निवडणुकीत पडतात. मी निवडणूक लढतो. मीसुद्धा एकदा पडलो आहे. पण मी दुसऱ्यांदा अजिबात पडणार नाही. मी पडण्यासाठी माझं राजकारण करत नाही.

मी पडण्यासाठी राजकारण करत नाही, असे सांगताच एका उत्साही कार्यकर्त्याने घोषणा द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात आठवलेंच्या रागाचा पारा चढला. ते म्हणाले की, ए...ए थांब. आगाऊपणा करू नकोस. नीट सरळ उभा राहा. असे लोक असल्यामुळे पार्टीचा सगळ्या पार्टीचा सत्यानाश झालेला आहे. अधिवेशनाला आलं तर खाली व्यवस्थित बसलं पाहिजे. अशी ही काय पार्टी असते का. असा आगाऊपण केला तर सगळ्यांना पार्टीतून आऊट करून टाकीन. कुठेही येतात आणि उभे राहतात, हे काही बरोबर नाही. वेळ झालेली आहे, घोषणा देऊन काय उपयोग आहे, अशा शब्दांत त्या उत्साही कार्यकर्त्याला आठवले यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT