Raosaheb Danve-Uddhav Thackeray
Raosaheb Danve-Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

वीजटंचाई : ‘त्यांना बाहेरून वीज घ्यायचीय’; दानवेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोळशाचे राज्य सरकारकडे सुमारे तीन हजार कोटी रुपये थकीत आहेत. तरीही केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्राला कोळशाचा पुरवठा बंद केलेला नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त कोळसा राज्याला दिला आहे. हे केंद्र सरकारकडे बोट दाखवत असले तरी नियोजन नसल्यामुळेच राज्यात वीजटंचाई आहे. यांना बाहेरून वीज घ्यायची आहे, असा आरोप रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाराष्ट्र सरकारवर केला आहे. (Raosaheb Danve's big accusation against Thackeray government)

भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे उद्‌घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना दानवे यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्र सरकारला जास्त कोळसा दिलेला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५७ मिलियन टन कोळसा दिला होता, या वर्षी ७३ मिलियन टन कोळसा दिलेला आहे. त्यानंतरही राज्यात विजेची टंचाई आहे. ही वीजटंचाई केवळ ‘महाजनको’चे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे होत आहे.

‘महाजनको’ने केंद्र सरकारकडून किती कोळसा घेतला, त्यातून किती युनीट विजेची निर्मिती झाली आणि जनतेला किती युनीट दिले, याचा हिशेब एकदा ‘महाजनको’ने लावला पाहिजे. त्यानंतरच केंद्र सरकारवर आरोप केले पाहिजेत. केंद्र सरकारचे राज्य सरकारकडे कोळसाची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. तरीही आम्ही राज्य सरकारचा कोळसा पुरवठा बंद केलेला नाही. केवळ नियोजन नसल्यामुळे विजेची टंचाई आहे, त्यांना वीज बाहेरून घ्यायची आहे, त्यामुळे ते केंद्र सरकारवर आरोप करत आहेत, असा आरोपही रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर केला.

एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के कपात

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी रेल्वेने आज (ता. २९ एप्रिल) मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT