Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विशेष

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह इंच न इंच जमीन महाराष्ट्रात आणू : विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून होणार होणार अशी चर्चा असलेला महाराष्ट्र (Maharashtra)-कर्नाटक (Karnataka) सीमा प्रश्नासंदर्भातील (Border issue) ठराव (Resolution) आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी विधानसभेत मांडला. तो एकमताने मंजूर झाला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ गावांतील इंच न इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. (Resolution on Maharashtra-Karnataka border issue passed unanimously in Legislative Assembly)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावाची घोषणा करताच विधानसभेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणने विधानसभा दुमदुमली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा ठराव मांडला आणि विधानसभेतील उपस्थित सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला.

दरम्यान, ठराव मंजूर झाल्यानंतर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी देशात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. पण असा ठराव करण्याची हिम्मत दाखवली नाही. ती आपण दाखवली, असे सांगताच विरोधी बाकाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घालताच मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा वगळून आभाराच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतरच विरोधक शांत झाले.

तत्पूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या ठरावात काही दुरुस्त्या सुचविल्या. त्यामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांचा त्यात उल्लेख करण्यात यावा, अशी सूचना केली. तसेच, या ठरावात काही व्याकरणाच्या चुका झाल्या आहेत. त्याही दुरुस्त करण्याचे सूचविले. सत्ताधारी बाजूने त्यावर सहमती दर्शविण्यात आली. मात्र, ठरावावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावण्यात आली.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यकत तो पाठपुरावा महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT