बारामती : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बारामतीत (Baramati) आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत बोलताना ‘होम मिनिस्टर जबाब दो....’ असे म्हणत थेट फडणवीस यांनाच लक्ष्य केले. (Supriya Sule thanked Amit Shah and criticized Devendra Fadnavis)
याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे जाहीर आभार मानले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाविकास आघाडीने वेळ मागितल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने वेळ दिला. इतकेच नाही तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वक्तव्ये केली. हा अमित शहा यांचा तर अपमान आहेच, शिवाय महाराष्ट्राच्या विरोधात कोणीतरी मोठं षडयंत्र रचतंय, कोण हे करतंय याचा शोध घ्यावा लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्याच्या विविध भागात होणारे हल्ले, महिलांवरील अत्याचार व विविध ठिकाणच्या कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती या बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, नागपूरमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हजर असताना अनेक घटना घडतात. बारामती, पुणे, पालघर ठाण्यातही अनेक घटना घडल्या आहेत. मागच्या काळात ते गृहमंत्री असतानाही अशीच परिस्थिती होती, प्रशासन व मंत्री काय करतात हा प्रश्न आहे.
लोकसभेच्या अधिवेशनात चीन तसेच कोविडवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती. दोन्ही विषयांवर केंद्राने चर्चा घेतली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्याने काहीही भूमिका घेतली नाही, ही बाबही या निमित्ताने समोर आली.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, विरोधी पक्ष सातत्याने भूमिका मांडत आहे. राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे, मुख्य विषयांना बगल देण्याचे काम सरकारकडून होत आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु असून न्यायालयाकडून नक्की न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
जागतिक महामंदीची चिन्हे दिसत असताना त्याचा नक्कीच काही परिणाम भारतावरही होणार आहे. या संदर्भात केंद्राची योजना तयार हवी ही बाब आम्ही केंद्राला वारंवार सांगूनही काहीही होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.