Congress Leader Satej Patil : लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाने हरळून न जाता आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने खचून न जाता काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी सेंट्रल पॉलिटिक्सला सुरुवात केल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्राचा राजकारणात काँग्रेसचा ताकदवार नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पण आता त्या पलीकडेही जाऊन मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणातही आपली वेगळी छाप उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
महायुतीचा(Mahayuti) ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी नुकताच मुंबईत मोर्चा पार पडला. या मोर्चाला महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये सतेज पाटील यांचे नेतृत्व दिसून आले.
2014 च्या राजकारणानंतर काहीसे बॅक फुटवर पडलेल्या सतेज पाटील यांनी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत(Vidhan Sabha Election) कमबॅक केले. विधानसभेवर चार तर विधान परिषदेवर स्वतःसह तीन आमदार निवडून आणले. त्याचेच फलित म्हणून त्यांना विधान परिषदेतील गटनेते पद मिळाल्याचे दिसून आले. तर 2024च्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निवडून आणला. तर बाजूच्या सांगली जिल्ह्यात देखील अपक्ष विशाल पाटील यांना निवडून आणण्यात व पुन्हा काँग्रेसकडे आणण्यात सत्यजीत पाटील यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
पश्चिम महाराष्ट्रात सतेज पाटील यांची दमदार कामगिरी सुरू असताना, विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना फटका बसला. कोल्हापूर जिल्ह्यातून पाच उमेदवारापैकी एकही जागा काँग्रेसची आली नाही. परंतु या अपयशामुळेही न खचता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते आधीप्रमाणेच काम करताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवड समितीत सतेज पाटील(Satej Patil) यांना घेण्यात आले होते. इतकेच नव्हे तर नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे नाव देखील आघाडीवर होते. सध्या सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवर तुटून पडणारे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा देखील समावेश आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. भविष्यकाळात या आंदोलनाची धग बारा जिल्ह्यात वाढवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सहाजिकच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सतेज पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा वाढणार असल्याचे दिसते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.