
Holi and Ramadan 2025 : क्रूरकर्मा औरंगजेबाचे कौतुक करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी रंग अंगावर किंवा मशिदीवर उडल्यावर काय करायचे यावर भाष्य केले आहे.
होळी उत्साहाने साजरी करा. पण पवित्र रमजान हा सण देखील सुरू आहे. या काळात मुस्लिमांवर संमतीशिवाय रंग टाकू नका, मुस्लिम बांधवांनाही अंगावर रंग पडल्यास भांडणात उतरू नका, असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.
समाजवादी पक्षाचे मुंबईतील (Mumbai) आमदार अबू आझमी यांनी अधिवेशनाच्या सुरवातीला क्रूरकर्मा औरंगजेबाच्या प्रशासनाचे कौतुक केले होते. त्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ झाला. अबू आझमी यांच्यावर सभागृहातून निलंबनाची कारवाई झाली. आता होळी आणि पवित्र रमजान सण एकत्र साजरा होत आहे. यात मशिदीवर रंग उडू नये यासाठी त्या मेन कापडांनी झाकल्या जात आहेत.
अबू आझमी यावरून हिंदू-मुस्लिम (Muslim) बांधवांना आवाहन केले आहे. हा महिना क्षमा आणि बंधुत्वाचा आहे. प्रत्येकाला आपला धर्म जपण्याचा अधिकार आहे. सणांचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मिळून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
"आपल्या देशात गंगा-जमुना यांची परंपरा आहे. तरीही काही लोक गैरकृत्य करतील. रंग टाकून वाद निर्माण करतील. आपल्याला उत्सवांचे राजकारण करण्याची गरज नाही. उद्या होळी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी उत्साहाने होळी साजरी करावी पण कोणत्याही मुस्लिम बांधवांवर संमतीशिवाय रंग टाकू नये", असे आवाहन अबू आझमी यांनी केले.
"पवित्र रमजान असल्याने, नाईलाजाने घरात नमाज अदा करता येत नाही, याकडे लक्ष वेधताना, रमजानची नमाज मशिदीत अदा केली जाते. मुस्लिम मशिदीतच जाऊन नमाज पडावा. यात अंगावर रंग पडला, तरी भांडणाला उतरू नये. बंधुत्वाचा आणि क्षमा करण्याचा महिना असल्याने रंग पडला म्हणून तंटे करू योग्य ठरणार नाही. काही लोक मुद्दाम मशिदीवर रंग टाकतील, त्यामुळे भांडणे होऊ नये त्यासाठी मशिदी झाकल्या जात आहे", असेही अबू आझमी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.