Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

सावरकरांवर राहुल गाधींची टीका; पण सामना भाजप-सेनेत : उद्धव ठाकरेंचे एक घाव दोन तुकडे!

Uddhav Thackeray News : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारज जोडो' यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारज जोडो' यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली असली तरी त्यावरुन भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांमध्ये सामना रंगला आहे. भाजपेने उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन ठाकरेंनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करत एक घाव दोन तुकडेच केले.

ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली, त्याच राहुल गांधींना दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मिठी मारली होती. त्यांच्या यात्रेत सहभागी झाले होते. राहुल यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची (Shivsena) भूमिका काय? असा सवाल करत भाजपने-शिवसेनेला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपला आणि आरएसएसला चांगलेच सुनावले.

आम्हाला सावरकरांबद्दल अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहे. कुणी कितीही पुसू म्हटली तरी ती पुसली जाणार नाही. मात्र, स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा, असा सवाल त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्याशी ज्यांचा सुतराम संबंध नाही. त्या मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणे हे हास्यास्पद आहे. आम्ही तर तेव्हा नव्हतो. मात्र, ज्या आरएसएसला आता एक दोन वर्षामध्ये १०० वर्ष होणार आहे, ते स्वातंत्र्यलढ्यात कुठे होते? असे कठोर सवाल करत ठाकरे यांनी भाजपलाच घेरले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून जे लांब होते, त्यांनी वीर सावकरांबद्दल बोलू नये. त्यांना बोलण्याचाच अधिकार नाही. ज्या स्वातंत्र्यवीरांनी सावरकरांनी त्याग केला, तेच स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो. त्यामुळे भाजपने बाष्कळपणा बंद करावं, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले. पहिल्यांदा तुमचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगा आणि नंतर आम्हाला प्रश्न विचारा, असेही ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT