Tanaji Sawant-Rashmi Bagal
Tanaji Sawant-Rashmi Bagal  Sarkarnama
विशेष

शिवसेना नेत्या रश्मी बागल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) विधानसभा मतदारसंघाची २०१९  ची निवडणूक शिवसेनेकडून लढवलेल्या शिवसेनेच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे . कारण, रश्मी बागल आणि त्यांचे तालुक्यातील कट्टर विरोधक माजी आमदार नारायण पाटील यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या दोघांनी आदिनाथ कारखान्यात एकत्र काम करण्याची सूचना सावंत यांनी केली आणि या दोघांनी ती मान्य केली आहे. (Shiv Sena leader Rashmi Bagal on the path of Chief Minister Eknath Shinde group)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ४ सप्टेंबर) माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यांची आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात पुण्यात सावंत यांच्या कार्यालयात बैठक झाली. राज्यात सत्तांतर झाल्यापासून  शिवसेनेत असलेल्या रश्मी बागल यांनी आपण शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत  की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहोत, याबाबत कोणतीही स्पष्ट  भूमिका अद्याप घेतलेली नाही.  मात्र, आज पुणे येथे आरोग्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवरून  त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचाल अधोरेखित केली आहे, असे संकेत मिळत आहेत.

विधानसभेच्या २०१९  च्या निवडणुकीत त्यावेळच्या परिस्थितीत मातोश्रीवर वजन असलेले शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.  रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून करून रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

तानाजी सावंत यांचे नेतृत्व मान्य करणाऱ्या रश्मी बागल मधल्या काळात भाजपच्या संपर्कात असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या . मात्र, आजच्या पुणे येथे झालेल्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्याने  त्या पुन्हा एकदा मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे गटाबरोबर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आजच्या बैठकीबाबत रश्मी बागल यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT