सावंतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेला धक्का; एक हजार कार्यकर्ते-पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

काही महत्वाची नावे सोमवारी प्रवेशप्रसंगीच उघड करणार असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama

सोलापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Swanat) हे सोमवारी (ता. ५ सप्टेंबर) सोलापूर (solapur) जिल्हा व शहर दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात नातेपुते व सोलापूर येथे मिळून सुमारे एक हजार कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार आहेत. यामध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सावंत गट पुन्हा बाळसे धरताना दिसून येत आहे. (Thousand activists of Shiv Sena along with Congress-NCP will join Eknath Shinde group)

मंत्री तानाजी सावंत यांचे सोमवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता पुण्याहून नातेपुते (ता. माळशिरस) येथे आगमन होणार आहे. तेथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे समीर शेख आणि त्यांच्या सोबतचे सतीश सपकाळ, शिवम लांडगे, मनोज लांडगे आणि राष्ट्रवादीचे दादा मुलाणी यांच्यासह फोंडशिरस, मांडवे व परिसरातील सुमारे तीनशे कार्यकर्त मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तसेच, सोलापूर येथे हेरिटेज सभागृहात सुमारे सातशे ते साडेसातशे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Tanaji Sawant
कट्टर विरोधक नारायण पाटील-रश्मी बागल येणार एकत्र; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा पुढाकार

या पदाधिकाऱ्यांचा होणार प्रवेश

सोलापूर येथील हेरिटेज सभागृहात सोमवारी सायंकाळी सोलापूर, अक्कलकोटसह इतर तालुक्यातील सातशे ते आठशे जणांचे प्रवेश होणार आहेत. यामध्ये प्रियदर्शन साठे, दीपक पाटील, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विशाल कल्याणी, आशिष परदेशी, शिरीष चलवादी, प्रशांत लोणार, अभिजीत ढाळप, गजानन कदम, सचिन चव्हाण, गजानन थोरात, नागेश पोतदार, नितीन साबळे, जावेद गडवाली, संदीप पाटील, श्रीकांत मोरे, सुदर्शन साठे, राज बिडला, शेखर खिल्लारे, मनीष मांगोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सावंत गटात प्रवेश करणार आहेत.

Tanaji Sawant
शिवसेनेतील नवी पदाधिकारी निवड ठाकरेंसाठी ठरली डोकेदुःखी

शिंदे गटाकडे ओघ वाढला

सरकार स्थापनेनंतर आषाढी एकादशीच्या महापुजेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा झाला होता. या दौऱ्यात माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे यांनी पंढरपूर येथे शिंदेगटाचा पहिला मेळावा घेतला होता. या मेळाव्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणारांची संख्या वाढत आहे. सोमवारी होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांनतर काहींचे पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. माळशिरस तालुक्यातील नऊ अपक्ष नगरसेवक आणि दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.

Tanaji Sawant
‘हर्षवर्धन पाटीलसाहेब, तुमचा त्रास कमी झाला का..? नसेल तर आपल्याकडील पान्याने टाईट करू’

काही नावे गुलदस्त्यात

नातेपुते व सोलापूर येथे मिळून सुमारे एक हजार पदाधिकारी शिंदे गटात येणार असल्याचे शिंदे गटातील पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, काही महत्वाची नावे सोमवारी प्रवेशप्रसंगीच उघड करणार असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले. नेमके कोणकोण पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील हे सोमवारी सायंकाळीच उघड होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com