मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) तब्बल ११ खासदारांनी (MP) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थिती होती. याचवेळी कोणत्या खासदाराने कोणत्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र द्यायचे आणि कोंडीत पकडण्याची रणनीती याच बैठकीत ठरली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Shiv Sena's 11 MPs meet to BJP Leader Amit Shah)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीतील कृष्णा मेनन या निवास स्थानात राहतात. शहा यांच्या या निवास स्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे, तर याच निवास स्थानाला एक मागील प्रवेशद्वारदेखील आहे. याशिवाय या बंगल्याला मध्यभागीसुद्धा प्रवेशद्वार असल्याचे सांगितले जाते. याच मागच्या प्रवेशद्वारातून जाऊन शिवसेनेच्या एकूण ११ खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांना भेट घेतली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्री शहा यांनी सविस्तर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच, कोणत्या खासदारांनी, कोणत्या मुद्द्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कधी आणि कसं पत्र द्यायचं आणि पक्षप्रमुख ठाकरे यांना कोंडीत पकडायचे, यासंदर्भातली चर्चाही या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी शिवसेनेच्या एका तरुण आणि उच्चशिक्षित खासदाराने व्यूहरचना केल्याची खात्रीलायक माहिती आहे. अमित शहा यांच्याकडे ११ खासदारांना घेऊन जाणारा खासदार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा खास समजला जातो.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले हेाते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्याचवेळी या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केल्याची चर्चा होती. मध्यरात्री दोनपर्यंत ही खलबतं सुरू होती, असेही सांगण्यात येत होते. मात्र, त्यावेळी या दोघांनीही त्यांचा इन्कार केला होता. मात्र, या भेटीच्या बातमीने ती काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.