मोठी बातमी : शिवसेनेला मोठा धक्का; ‘मातोश्री’वरील बैठकीला १० खासदारांची दांडी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे.
Shivsena Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News, Uddhav Thackeray News in Marathi
Shivsena Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News, Uddhav Thackeray News in Marathi Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस ‘मातोश्री’वर (Matoshri) सुरुवात झाली आहे. पण, या बैठकीला शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी तब्बल १० खासदारांनी दांडी मारली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे. आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे, त्यामुळे या खासदारांच्या अनुपस्थितीचा ते नाराज असल्याचा अर्थ काढण्यात येत आहे. (10 Shiv Sena MPs absent from meeting convened by Uddhav Thackeray on Matoshri)

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी केवळ ९ खासदार उपस्थित होते. तसेच राज्यसभेच्या दोन्ही खासदारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने भावना गवळी यांना हटवून पक्ष प्रतोद म्हणून नेमणूक केलेले ठाण्याचे खासदार राजन विचारे हेही बैठकीला अनुपस्थित आहेत.(Shivsena Latest Marathi News)

Shivsena Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News, Uddhav Thackeray News in Marathi
बंडखोर आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात; तिसरा बंडखोर अपघाताला सामोरे

त्यामध्ये लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर (मुंबई नॉर्थ वेस्ट),  अरविंद सावंत (मुंबई दक्षिण),  विनायक राउत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), धैर्यशील माने, (हातकणंगले),  हेमंत गोडसे (नाशिक),  राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई),  श्रीरंग बारणे (पिंपरी-चिंचवड), प्रताप जाधव (बुलढाणा), सदशिव लोखंडे (शिर्डी). राज्यसभेचे  संजय राऊत आणि  प्रियंका चतुर्वेदी हे दोन्ही खासदारांची बैठकीला हजेरी होती.(Maharashtra Political Crisis News)

Shivsena Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News, Uddhav Thackeray News in Marathi
Shivsena: शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे बॅकफुटवर येणार?

मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर असणाऱ्या खासदारांमध्ये भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), राजेंद्र गावित (पालघर), संजय जाधव (परभणी), संजय मांडलिक (कोल्हापूर), हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), कृपाल तुमाने (रामटेक), राजन विचारे (ठाणे), कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली).

Shivsena Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News, Uddhav Thackeray News in Marathi
मला काढण्याचा कोणालाही अधिकार नाही; हकालपट्टीनंतर संतोष बांगर यांचा खुलासा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, तुमाने यांनी त्याचा इन्कार केला होता. मात्र, तेच तुमाने आजच्या मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर राहिल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com