DK Shivakumar, Mallikarjun Kharge, Siddaramaiah
DK Shivakumar, Mallikarjun Kharge, Siddaramaiah Sarkarnama
विशेष

Karnataka Govt Formation : असा सुटला कर्नाटकचा तिढा; चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदावर अडून बसलेल्या डीके शिवकुमारांना एक फोन आला अन्...

सरकारनामा ब्यूरो

Karnataka CM Announcement : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन मागील चार दिवसांपासून सुरु असलेले काँग्रेसमधील नाट्य अखेर संपले आहे. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याच निर्णय घेतला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री बनणार आहेत.

बुधवारी रात्री कर्नाटकच्या (Karnataka Elections) मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदारुन रात्री दिल्लीमध्ये खलबते सुरु होती. सिद्धरामय्या कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत आधी बैठक सुरु होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते अजय सिंह यांनी सांगितले की 'अंतिम निर्णय आज रात्रीच होणार आहे.

त्यानंतर सुरजेवाला, केसी वेणुगोपाल यांच्या घरी पोहोचले. नंतर चर्चेला सुरुवात झाली. याच बैठकीत शिवकुमार (DK Shivakumar) यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार करण्यात आले. सुमारे रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आधी शिवकुमार यांना समजूत घातली. त्यानंतर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही चर्चा केली.

मात्र, सगळे सुरु असतानाही काहीच तोडगा निघत नव्हता. त्यानंतर शिवकुमार यांना सोनिया गांधींशी (Sonia Gandhi) बोलणे करून दिले गेले. शिवकुमार यांनी सोनिया गांधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा रात्री सोनिया गांधी आणि शिवकुमार यांची फोनवरुन चर्चा झाली, त्यानंतर शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला, असे मीडिया रिपोटनुसार समोर येत आहे.

तसेच शिवकुमार यांना काही आश्वासनेही देण्यात आली आहेत. 'कर्नाटकात त्यांच्या संमतीशिवाय निर्णय होणार नाहीत' सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवले जात असले तरी प्रत्येक निर्णयात त्यांना उपमुख्यमंत्री यांची संमती घ्यावी लागणार. यासोबतच तुमच्या मर्जीतील आमदारांना हवे ते खाते दिले जाईल, असेही शिवकुमार यांना सांगण्यात आले. अडीच वर्षांनंतर सिद्धरामय्या यांना हटवून तुम्हाला मुख्यमंत्री बनवले जाईल, अशी आश्वासने शिवकुमार यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे सर्व घडत असताना शिवकुमार यांच्यासोबत त्यांचे 8 ते 10 समर्थक होते. कर्नाटकातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले भाऊ डीके सुरेशही उपस्थित होते. सोनिया गांधींशी बोलल्यानंतर शिवकुमार यांनी नवीन फॉर्म्युला पूर्णपणे मान्य केला, असल्याचे सांगितले जात आहे. सिद्धरामैय्या शनिवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT