Karnataka new CM : काँग्रेसने कर्नाटकात बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. यामागे AHINDA वोट बँकचे मोठे योगदान आहे. हा AHINDA फॉर्मूला काय आहे, हे जाणून घेऊया. याच 'AHINDA'मुळे सिद्धरामय्या यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाच दिवसांनी अखेर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांचे नाव जाहीर करण्यात आले. ते कर्नाटकाचे ३० वे मुख्यमंत्री आहेत.
काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
निवडणुकीतील विजयानंतर दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरु होता. या बैठकांना अखेर यश आलं असून सिद्धरमय्या यांच्याकडे सत्तेच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत.
सुरजेवाला यांना यावेळी पाच वर्षांचा कालावधी दोघांमध्ये विभागला जाणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की "सत्ता फक्त कर्नाटकच्या जनतेसोबत वाटली जाईल, याशिवाय दुसरं काही नाही".
काय आहे AHINDA फॉर्मूला
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने AHINDA फॉर्मूला पूर्णपणे वापरला. AHINDA हा कन्नड शब्द आहे. A म्हणजे अल्पसंख्यातरु(म्हणजे मुसलमान), HIN म्हणजे हिंदुलिदावारु (म्हणजे मागास जाती-जमाती), DA म्हणजे दलितारु (म्हणजे दलित समाज)
देवराज ऊर्स यांनी मांडला होता AHINDA फॉर्मूला
कर्नाटकच्या राजकारणात हा फॉर्मूला प्रथम देवराज ऊर्स यांनी मांडला होता. सिद्धरामय्या यांनी हा AHINDA फॉर्मूला २०१३ मध्ये पहिल्यांदा वापरला, तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.