शिरूर (जि. पुणे) : रावसाहेबदादा पवार घोडगंगा (Ghodganga) सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) अध्यक्षपदी तरुण संचालक तथा आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे चिरंजीव ऋषिराज पवार (Rishiraj Pawar) यांची अनपेक्षितपणे निवड झाली. ऋषिराज यांच्या निवडीमुळे पवारांची तिसरी पिढी घोडगंगा कारखान्याच्या अध्यक्षपदावर काम करणार आहे. आजोबा रावसाहेबदादा पवार (Raosahebdada Pawar), वडिल आमदार अशोक पवार यांच्याप्रमाणे ऋषीराज यांच्याकडून कामाची अपेक्षा शेतकऱ्यांना असणार आहे. (Sources of Ghodganga sugar factory to third generation of Pawar family)
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार अशोक पवार यांची पाचव्यांदा जिंकली आहे. मोठ्या विजयानंतर आणि कारखान्याची सद्यस्थिती पाहता अध्यक्षपदावर अशोक पवार यांचीच निवड होईल, अशी शक्यता सर्वत्र व्यक्त होत होती. मात्र, धक्कातंत्रासाठी माहीर असलेले अशोक पवार यांनी घोडगंगा कारखान्यात ते तंत्र वापरले आणि अध्यक्षपदाची माळ ऋषिराज यांच्या गळ्यात पडली.
वास्तविक, शिरूर तालुक्याचे दिवंगत माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांनी घोडगंगा साखर कारखान्याची मोठ्या कष्टाने उभारणी केली. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर काही वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वयोमानानूसार त्यांनी राजकीय इच्छा आकांक्षांचा त्याग केल्यानंतर १९९७ पासून त्यांचे चिरंजीव अशोक पवार यांच्यावर सभासदांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
सर्वसामान्य सभासदांनी दिलेल्या या संधीचे सोने करीत आमदार पवार यांनी तेव्हापासून सलग पंचवीस वर्षांहून अधिक काळ अध्यक्षपदाच्या माध्यमातून कारखान्याचा यशस्वी कारभार केला. आजोबा (स्व.) रावसाहेबदादा पवार यांनी स्थापन केलेल्या आणि वडील आमदार ॲड. अशोक पवार यांनी प्रदीर्घ काळ सूत्रे सांभाळलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाची जवळून ओळख आणि बऱ्यापैकी माहिती असलेल्या ऋषिराज पवार यांना आता अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे रावसाहेबदादा पवार यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीकडे कारखान्याच्या कारभाराची सूत्रे आली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.