Tejashwi Yadav Sarkarnama
विशेष

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्यावरून महाआघाडीत अजूनही मतभेद का आहेत?

Congress on Tejashwi Yadav : एककीडे लालू प्रसाद यादव हे आपल्या पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना यंदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसयासाठी सहमत नसल्याचे दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

Tejashwi Yadav CM face in Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महायुती आणि महाआघाडीनेही कंबर कसली आहे. महायुती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीचे अद्याप याबाबत काही ठरले नसल्याचे दिसते. कारण, एककीडे लालू प्रसाद यादव हे आपल्या पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना यंदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसयासाठी सहमत नसल्याचे दिसत आहे.

 भाजपच्या संसदीय मंडळाकडून मंजूरी येईपर्यंत नितीश कुमार यांची मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी निश्चित मानता येत नाही. तर दुसरीकडे काँग्रेसनेही तेजस्वी यादव यांचे प्रकरण त्याचप्रकारे अडकवले आहे, ज्याप्रकारे भाजपने नितीश कुमार यांची उमेदवारी अडकवली आहे. तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्रिपदाचा दावा देखील नितीशकुमार यांच्यासारखाच गुंतागुंतीत अडकला आहे, हे खरे आहे.

मात्र अडचणी आणि आव्हान समान नाहीत. कारण, तेजस्वी यादव यांच्या बाबतीत आव्हानं जास्त दिसतात. भाजपकडे सध्या नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेण्याचा पर्याय दिसत नाही, परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखवलेल्या भूमिकेमुळे काहीही अशक्य वाटत नाही.

तेजस्वी यादव २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी महाआघाडीचा चेहरा राहिले आहेत. सध्या ते बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, पक्ष पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी तशी वातावरण निर्मितीही केली आहे. मात्र महाआघाडीतील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला हे मान्य नसल्याचे दिसते. कारण, काँग्रेस आणि राजद नेते अनेकदा भेटले आहेत व जवळजवळ प्रत्येक बैठकीनंतर हा प्रश्न विचारला गेला, परंतु काँग्रेस नेत्याकंडून त्यावर उत्तर टाळले गेले आहे.

महाआघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता, राजद नेते मनोज झा म्हणतात की सध्याच्या परिस्थितीत तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. ते इच्छा असूनही हे टाळू शकत नाहीत. कारण, बिहारमधील लोक हे मान्यच करणार नाही, ही गोष्ट घराघरात पोहचली आहे. तर काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणतात की, यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तर कधीकधी ते असंही म्हणतात की सध्या लक्ष्य महत्त्वाच्या मुद्य्यांवर आहे, हे सर्व नंतर पाहिले जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT