Rahul Gandhi - राहुल गांधींसाठी आव्हान ठरताय 'ही' तीन राज्ये; अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बसतोय फटका

Congress internal conflict - काँग्रेससाठी सद्यस्थितीस सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाचे अनेक दिग्गज नेते पक्षाच्या शिस्तीचे पालन करताना दिसत नाहीत आणि अतंर्गत गटबाजीही संपत नाही
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi's Strategy to Handle Congress Infighting- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार केंद्रातील त्यांच्या कार्यकाळाची ११ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. तर ११ वर्षांपूर्वी केंद्रातील सत्ता गमावल्यानंतर, काँग्रेस राज्यांमध्येही आकुंचित होऊ लागली आहे. आता केवळ तीन राज्यांमध्ये (हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक) स्वतःच्या बळावर सत्तेत असणाऱ्या काँग्रेसमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्याचे हायकमांडचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी, आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

काँग्रेससाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाचे अनेक दिग्गज नेते पक्षाच्या शिस्तीचे पालन करत नाहीत आणि त्यामुळे अतंर्गत गटबाजीही संपत नाही. आता पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून राहुल गांधींनी अडचणी निर्माण करणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एप्रिलमध्ये गुजरातला भेट दिली होती, जिथे त्यांनी काँग्रेसचा संघटना निर्मिती कार्यक्रम सुरू केला होता. गुजरातनंतर, काँग्रेसच्या संघटना निर्मिती कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राहुल गांधींनी मध्य प्रदेश आणि तिसरा हरियाणा ठरवला. राहुल गांधी यांनी या दोन्ही राज्यांनाही भेट दिली. या राज्यांमधून संघटना निर्मितीची मोहीम सुरू करण्यामागे त्यांची एक रणनीती आहे.

खरंतर लोकसभा निवडणूक निकालानंतरच राहुल गांधींनी म्हटलं होतं की, आम्ही भाजपाल गुजरातमध्ये पराभूत करू. परंतु त्यांनाही माहिती आहे की, हे काम एवढं सोपं नाही. याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधींनी अशा राज्यांमध्ये पक्षाचे संघटन वाढवण्यावर भर देणं सुरू केल्याचे दिसत आहे.

Rahul Gandhi
Indian economy growth : मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत, 'या' ११ कामांनी बदलले भारताच्या अर्थव्यवस्थेचे चित्र!

राहुल गांधींचे मुख्य लक्ष्य गुजरात आहे, कारण कधीकाळी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या या राज्यात काँग्रेस  तब्बल तीन दशकांपासून म्हणजेच १९९५ पासून सत्तेबाहेर आहे. मध्यप्रदेश आणि हरियाणातही अशीच स्थिती आहे. मध्य प्रदेशात कमलानाथ यांच्या नेतृत्वातील अल्पकालीन काँग्रेस सरकारचा कार्यकाळ वगळला तर २००३ पासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. तर हरियाणातही मागील तीन विधानसभा निवडणुकात काँग्रेसला परभाव सामोरे जावे लागले आहे.

ही तीन राज्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेससाठी कमकुवत आहेत. यूपीएच्या नेतृत्वाखालील सरकारने १० वर्षे देशावर राज्य केले तरीही पक्ष येथे काहीही आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. उलटपक्षी, उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात स्वतःच्या बळावर बहुमत मिळवणे कठीण मानले जात असताना भाजप या तिन्ही राज्यांमध्ये सत्तेत आहे. बिहारसारख्या राज्यात, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार सारख्या दिग्गजांचा पाठिंबा असूनही, भाजप लालू यादव यांच्या बालेकिल्ल्यात घुसू शकला नाही. आता, ईशान्येपासून उत्तरेपर्यंतच्या राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची अधिक सरकारे असताना, काँग्रेस कदाचित त्यांच्या सर्वात मजबूत बालेकिल्ल्यात कमळाच्या चिन्हाने पक्षाला आव्हान देण्याचा विचार करत असेल.

Rahul Gandhi
Modi government top decisions : मोदी सरकारने वर्षभरात घेतलेले १० मोठे निर्णय, ज्याची चर्चा झाली जगभर!

गुजरात, मध्य प्रदेश आण हरियाणा या तिन्ह राज्यात काँग्रेसचे सर्वात मोठे दुखणे गटबाजी आहे. मध्यप्रदेशात तर गटबाजीमुळे काँग्रेसला सत्ताही गमावावी लागली. येथील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कमलनाथ, दिग्विजय सिंह, अजय सिंह राहुल, अरूण यादव यांसारक्या नेत्यांच्या गटांत विभागलेले दिसतात.

गुजरात काँग्रेसचीही परिस्थिती अशीच आहे. या ठिकाणी शक्ती सिंह गोहिल, भरत सिंह सोलंकी गटासह अनेक लहान गटांमध्ये काँग्रेस विभागलेली दिसते. तर  हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला पराभवास सामोरं जावे लागले, यास कारणही अतंर्गत गटबाजी दिसून आली. या ठिकाणी काँग्रेस पक्ष भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा, रणदीप सुरजेवाला गटात विभागलेला आहे. एकूणच राहुल गांधींसमोर या तीन राज्यामधील अंतर्गत गटबाजी संपवण्याचे मोठे आव्हान दिसत आहे. तर सर्वप नेते मातब्बर असल्याने ते देखील हायकमांडच्या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद देतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com